Laxman Hake Hunger Strike Protest Jalna: Saamtv
महाराष्ट्र

OBC Reservation: आरक्षणाचा वाद पेटला! लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर, लातूर, बीडमध्ये रास्ता रोको; पाहा VIDEO

Gangappa Pujari

संदिप भोसले, ता. २१ जून २०२४

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये', अशी भूमिका घेत लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा नववा दिवस असून हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती खालावली आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतरही यावर तोडगा न निघाल्याने ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत.

राज्यभरात ओबीसी बांधव आक्रमक..

एकीकडे जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. अशातच आता हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ओबीसी बांधवही रस्त्यावर उतरला आहे. लातूर - सोलापूर महामार्गावरील औसा मोड येथे ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. 'ज्यांना आरक्षण पाहिजे, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण घेऊ नका,' अशी मागणी करत आंदोलकांनी १ तास महामार्ग अडवून ठेवला.

बीडमध्ये टायर जाळून रास्ता रोको

बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथील ओबीसी महिलांसह आंदोलकांनी बीड- अहमदनगर- कल्याण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको केला. या रस्ता रोको केलेल्या ओबीसी आंदोलकांनी थेट ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी फोन केला. आम्हाला जिव देण्याची वेळ आली तर देऊ, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभा राहू, असे आश्वासन यावेळी आंदोलकांनी दिले.

परभणीमध्येही आंदोलन

दरम्यान, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी वडीकोद्री येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या पाथरी येथील ओबीसी बांधवानी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. यावेळी ओबीसी बांधवानी एकच पर्व ओबीसी सर्व अश्या घोषणा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

SCROLL FOR NEXT