Marathi News Live Saam TV
महाराष्ट्र

Marathi News Live: कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

साम टिव्ही लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

साम टिव्ही

कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी

मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे व्यक्त केली नाराजी

(रश्मी पुराणिक)

मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री-

गृहमंत्री वळसे पाटील आणि पोलिस आयुक्त यांच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली नाराजी

-मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना केली विचारणा

- पोलिस यंत्रणा माहिती कशी मिळाली नाही या विषयी केली विचारणा पोलिसांचा गलथानपणा झालं, पोलिसांच्या त्रूटी यावर पांडे यांना याबाबत रिपोर्ट सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

सुप्रिया सुळेंच्या सुरक्षेत वाढ

(रश्मी पुराणिक)

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

सदावर्तेंना १४ दिवस पोलिस कोठडीची मागणी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी घुसण्यास आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या प्रकरणात एसटी कामगारांच्या एका गटाचे नेते अॅड. गुणवंत सदावर्ते यांना १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल अॅड. प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली आहे

मुख्यमंत्री - मुंबई पोलिस आयुक्त यांच्यात बैठक

मुंबई - मुंबई : एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात बैठक

गुणवंत सदार्वर्तेंसह ११० जणांना न्यायालयात केले हजर

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्याबाबत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अॅड. गुणवंत सदावर्ते यांना काल अटक केली आहे. त्यांना काही वेळापूर्वीच किला कोर्टात ११० आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांसह हजर करण्यात आले आहे.

सोनम कपूरच्या घरात १ कोटींची चोरी

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या पती आनंद अहुजासोबत त्याच्या दिल्लीच्या घरी राहते. त्यांच्या राहत्या घरी जबरी घरफोडी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनमच्या घरातून सुमारे १ कोटी रुपये लंपास केल्याची म्हटले जातं आहे.

सोनमच्या या दिल्लीच्या घरी १. ४१ कोटींची चोरी झाली आहे. याप्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आलिया - रणबीरचं लग्न १४ एप्रिलला होणार

आलिया - रणबीरचं लग्न १४ एप्रिलला होणार

कपूर फॅमेलीच्या RK House मध्ये आलिया- रणबीरचा विवाह सोहळा होणार

साम टिव्ही लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

राऊत पोलिस ठाण्यात जाणार नाहीत 

(सूरज सावंत)

मुंबई फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी संजय राऊत कुलाबा पोलिस ठाण्यात हजर होणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहेत. तपास अधिकारी राऊतांचा जबाब खासगीत नोंदवणार आहेत. राऊत यांनी दिलेल्या ठिकाणी पोलिस जाऊन जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salher Fort : ट्रेकिंग प्रेमींनो! सह्याद्रीतील उंच शिखरावरचा शौर्याचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याला भेट दिलीत का?

Kidney Failure: रिकाम्या पोटी पेनकिलर घेतल्याने किडनी निकामी होते? जाणून घ्या सत्य

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन, किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील ६३ धोकादायक पूल पाडणार

Kitchen Vastu Tips: किचनमधील 'या' गोष्टीमुळे होतो वास्तुदोष, घरात वाढते नकारात्मक उर्जा

SCROLL FOR NEXT