Marathi News Live - Saam TV
महाराष्ट्र

Breaking: राज्यपाल अभिभाशन सुरू झाल्यावर गोंधळ होणं अशोभनिय- मुख्यमंत्री

साम टिव्ही

राज्यपाल अभिभाशन सुरू झाल्यावर गोंधळ होणं अशोभनिय- मुख्यमंत्री

मिरारोड प्रॉपर्टीवर कारवाई झाली, मी न्यायालयात अपील करेन- सरनाईक

* उद्धव साहेब आमचे कुटूंब प्रमुख आहेत

* मी सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातलं आहे

* हिरानंदानी येथे माझं स्वतःचं घर आहे जिथे मी राहतो

* आणि मिरारोड येथील प्रॉपर्टीवर कारवाई झाली

* मी न्यायालयात अपील करेन

दिल्लीच्या ईडी पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे.

* दिल्लीच्या ईडी पथकाने मुंबईतून एकाला अटक केली आहे.

* दिल्लीतील बँक घोटाळा प्रकरणातील हा आरोपी असून निहाल गरवारे असे अटक आरोपीचे नाव..

* ट्रान्झिट रिमांड घेऊन टीम गरवारेला दिल्लीला नेहणार

मनसेच्या प्रवक्त्यांची यादी जाहिर...

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या नवनियुक्त प्रवक्त्यांची यादी जाहिर केली…

प्रताप सरनाईकांचे दोन फ्लॅट ईडीने केले जप्त

(सूरज सावंत)

मुंबई - ईडीने ठाण्यातील शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्या दोन फ्लॅट आणि मालमत्ता PMLA अंतर्गत जप्त केली असून याची किंमत 11.35 कोटी आहे... सविस्तर वृत्त लवकरच

पुणे नाशिक आणि नगर कल्याण असे दोन्ही मार्ग रोखले शिवसैनिकांनी...

(रोहिदास गाडगे)

पुणे नाशिक आणि नगर कल्याण असे दोन्ही मार्ग रोखले शिवसैनिकांनी...

आळेफाटा चौकात चक्का जाम...हजारो शिवसैनिक महामार्गावर आक्रमक भुमिकेत..

बिबट सफारी पार्क जुन्नरमध्येच व्हावं यासाठी शिवसेनेचे रास्तारोको आंदोलन..

बिबट सफारी पार्कसाठी जुन्नरमध्ये व्हावे यासाठी चार दिवसांपासुन शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे आ मरण उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा म्हणुन शिवसैनिक आक्रमक...!

नांदेड मध्ये महिला डाॅक्टरची आत्महत्या

(संतोष जोशी)

नांदेड च्या पंजाब लाॅज मध्ये एका महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय... काल रात्री ही घटना उघडकीस आली.. विद्या अमोल सुंकवाड असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे...गळ्यावर, हातावर कटरने कापून घेऊन ही आत्महत्या केलीय.. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे..

डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

(अश्विनी जाधव - केदारी)

पुणे - डीएसके प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार

ईडी समोर होणार सुनावणी

ईडी अधिकारयांनी डीएसके केसची कागदपत्रे ताब्यात घेतली

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात चालणार प्रकरण

गुंतवणूकदारांची करोडा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरू असलेल्या डीएसके प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत ईडी समोर होणार

पेट्रोल डिझेलवाढीचा पुन्हा भडका

(सूरज सावंत)

मुंबई - देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिजेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे गाडी चालवणेही कठीण झाले आहे. मुंबईत आज पेट्रोल ८४ पैशांनी वाढले आहे तर डिझेल ८५ पैशांनी वाढले आहे. मुंबई आज पेट्रोलची किंमत ११२.५१ रुपये झाले आहे. तर डिझेल ९६.७० रुपये झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचे परिणाम इतर ठिकाणीही दिसून येत असल्याने महागाईने नागरिक त्रस्त आहेत.

साम टिव्ही लाईव्ह न्यूज, ब्रेकिंग न्यूज, न्यूज अपडेट्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT