लोअर परळ येथे घराची भिंत कोसळून एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर केएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचार सुरू आहेत. एन एम जोशी मार्ग येथे ही दुर्घटना घडली आहे.
माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली आहे राजकीय सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप गीते समर्थकांनी केलाय लोकसभा निवडणुकीचा निकाल जिव्हारी लागल्याने मध्य नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई होता असल्याचा आरोप देखील करण्यात आलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान झाले या पालखी सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रमले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आळंदीत प्रशासनाची बैठक घेऊन आळंदी व परिसरातील समस्यांबाबत चर्चा केली. दरम्यान पवित्र इंद्रायणी चा गंभीर प्रश्न लवकरच सोडणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलय. यावेळी त्यांनी इंद्रायणी घाटावरुन नदीपात्राची पहाणी केली.
पुणे एल ३ हॉटेल ड्रग्स प्रकरणातील सर्व 10 आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने 1 जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची असून अनेक धागेदोरे हाती येणार असल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली.
वाडा पालघर बसला मनोर विक्रमगड रोडवर एसटी बसचा अपघात झाला आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने उपराळे गावाजवळ हा अपघात झाला असून कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा त्रास थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दारू घोटाळ्याशी संबंधित आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. त्यातून बाहेर पडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी विशेष करून लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी भाजपने दोन केंद्रीय मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रभारी भुपेंद्र यादव, सह प्रभारी अश्विनी वैष्णव, याची निवड करण्यात आली आहे त्यांनी आज भाजपच्या भाजपच्या महत्वाच्या नेत्याची बैठक घेतली.
राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
बीड जिल्ह्यातील एका माजी आमदाराला अहमदनगरच्या युट्युब पत्रकाराने ब्लॅकमेलिंग करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. युट्युब चॅनेलचा पत्रकार इस्माईल दर्याणी उर्फ भैय्या बॉक्सर या पत्रकारसह दोन महिलांवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदारांची अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी देत सुमारे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. कोतवाली पोलिसांनी या पत्रकारासह एका महिलेला तातडीने अटक केली आहे. तर एक महिला फरार झाली आहे.
माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मानाच्या 56 दिंड्या प्रत्येक दिंडीमध्ये ९० वारकरी संजीवन समाधी मंदिराच्या परिसरात दाखल होऊन रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास हा सोहळा संजीवन समाधी मंदिर परिसरात रंगतो. मानाच्या दिंड्यांमधील वारकरी भक्ती तल्लीन होऊन माऊलींच्या पालखी सोहळ्या प्रस्तानाचे साक्षीदार बनतात.
अमरावती शहर पोलिसांच्या 74 पदांसाठी पोलीस विभागाने 2865 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली होती. त्यापैकी 1431 उमेदवार मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाले असून यातील 929 उमेदवारांची लेखी परीक्षा अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयात 7 जुलै रोजी घेतली जाणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असून अफवांना व गैरप्रकारांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे. पुढील 15 दिवसात लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचेही नियोजन पोलीस खात्याने केले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगावमधल्या सावळदबारा या ठिकाणी वीज पडून एक गाय आणि वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही दिवसांच्या खंडानंतर तालुक्यात पावसाने विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यादरम्यान एक दुर्घटना घडलीय. गोठ्यात बांधलेल्या या दोन जनावरांवर वीज कोसळली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आहे. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केलाय.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्रचा स्लॅपचा भाग कोसळला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेले रुग्ण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने रुग्णालयातील रुग्णांना या घटनेत मोठी दुखापत झाली नाही. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्यानंतरही आरोग्य प्रशासन झोपेचे सोंग घेत घेत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या काळात विधानभवनात प्रचंड गर्दी होते. या विधानभवनातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. विधानभवनात येणाऱ्या अभ्यांगतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी प्रवेश दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही खोटं बोलत नाही. जे बोलतो, ते आम्ही करून दाखवतो. एका रुपयात पीक विमा दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं प्रत्येकी ६ हजार दिले. खोटं बोलू नका. खोटे बोला पण रेटून बोला. तुम्हालाही वाण नाही, पण गुण लागला, अशा शब्दांत शिंदेंनी विजय वडेट्टीवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
शक्तीपीठ महामार्ग हा राज्य महामार्ग घोषित करण्यात आला. २० दिवसांत अधिकाऱ्यांनी माहिती जमा केली आणि अधिसूचना काढण्यात आली. ठेकेदारांसाठी हा रस्ता बनवला जातोय, असा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला. या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे? या मार्गावर जमिनी कुणी घेतल्या आहेत का? कुणाची समृद्धी होणार आहे, याचा खुलासा झाला पाहिजे. हा रस्ताच रद्द झाला पाहिजे, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली.
डोंबिवली, नागपुरात कारखान्यांत स्फोट झाले, त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था नव्हती. पीडित कुटुंबीयांना नोकरी दिली पाहिजे. औद्यागिक सुरक्षा अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. तर नागपूर प्रकरणात कुटुंबीयांचं स्थलांतर केलं आहे. त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं.
पुणे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राजगड तालुक्यात पार पडली राष्ट्रवादी अजित पवार गटाची आढावा बैठक
बैठकीत आगामी विधानसभा आणि ज़िल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीची रणनीती ठरवत आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना
लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवाची कारणं शोधून चिंतन करत , त्यावर काम करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
तसेच सरकारच्या विविध योजना, केलेली कामं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याच्याही बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सूचना.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीसाठी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित
विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधीच विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. सत्ताधारी आमदार उद्धव ठाकरेंचे बॅनर हाती घेऊन पायऱ्यांवर घोषणा देत होते. त्याचवेळी विरोधकांनीही घोषणा सुरू केल्या. महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केलं. जोरदार घोषणाबाजी केली. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.
आज सकाळी टँकरने व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना व एका दुचाकीवर असणाऱ्या महिलेला धडक दिली होती. पुण्यात कोंढवा मधील एन आयबीएम रोडवर अपघात झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन चालक आणि टँकर मालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळील करोडी टोलनाक्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास पाच प्रवाशांना टोलनाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे पायी वारी घेऊन निघालेल्या शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीला पंढरपुरात मोठा मान असतो. मागील 55 वर्षांपासून महाराजांची पालखी पंढरपुरला जात असते. विदर्भातुन मराठवाड्यात दाखल झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात तीन मुक्काम करून महाजारांची पालखी गण गणात बोतेचा जयजयकार करीत परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या निषेधार्थ व खांडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी बीडचं शिरूर कासार शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. मुंडे समर्थकांनी ही बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासूनच शिरूर कासार बंद असून व्यापाऱ्यांनी देखील दुकाना बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, बीडमध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी खांडे यांचा निषेध केला जात आहे..
या ऑडिओ क्लिपमध्ये खांडे यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत बजरंग बाप्पांना कशी साथ दिली ? त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचं संभाषण देखील या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. आणि यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचे चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली असून यात घरातील जीवनावश्यक वस्तूसह मौल्यवान दागदागिने रोख रक्कम जळून खाक झाली आहे. पीडित घर मालकाचे नाव सुधाकर पुरुषोत्तम कठाने असे नाव असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती तलाठी,पोलिस यांना देण्यात आली तलाठी यांनी पंचनामा केला आहे.पीडित घरमालकाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावाला खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पसंती असल्याचे सूत्रांकडून समजते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला होता.
त्यामुळे राणेंना रोखण्यासाठी आता होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विनायक राऊत यांना विधान परिषदेत पाठवण्याची तयारी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनच सुरू असल्याची माहीती आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना वाढण्यासाठी विनायक राऊत यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.
लाडली बहीण योजनेचा अनेक महिलांना फायदाच होईल. विविध वयोगटातील महिलांसाठी सरकारच्या योजना आहेत. मात्र आता जाहीर केलेल्या योजनेमुळे देखील मोठ्या प्रमाणात मदत होईल, असा विश्वास आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला. तसेच पिक विम्याबाबत शेतकर्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अधिकच्या रकमेबाबत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांशी चर्चा करेल, असंही त्या म्हणाल्या
पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची रक्त तपासणी होणार आहे. या लोकांचे रक्त नमुने पुणे महापालिकेने NIV कडे पाठवले आहे. रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून 3000 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. शहरात आढळलेल्या झिका विषाणूंच्या 3 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी होणार
येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 200 च्या वर जागा जिंकेल - माजी खासदार सुभाष वानखेडे.
अँकर:- येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 200 च्या वर जागा जिंकेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिलीय.विधानसभेत महाविकास आघाडीलाच चांगलं यश मिळेल.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मला नांदेड जिल्ह्यातून कुठल्याही विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यास सांगतील त्या विधानसभा क्षेत्रातून मी निवडणूक लढण्यास तयात आहे.सुर्यकांता पाटील आता महाविकास आघाडीत आल्या आहेत.हदगाव हिमायतनगर या जागेवर पक्षश्रेष्ठी जे ठरवेल तेच उमेदवार दिला जाईल
सूर्यकांत पाटील महाविकास आघाडीच्या घटक आहेत. त्यामुळे हदगाव हिमायतनगर या जागेवर वर ते त्यांनी जरी दावा केला असेल तरी पक्षश्रेष्ठी जे ठरवल तेच निर्णय होईल असे माजी खासदार सुभाष वानखेडे म्हणाले.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक लाख तीस हजार रुपये अनुदानाचा गाय गोठ्याच्या बांधकामासाठी झालेल्या खर्चाच्या मोजमाप पुस्तिकेवर सह्या करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना वैजापूर तालुक्यातील रोहगाव येथील ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलंय.
अर्जुन गंगाधर खरबडे असे या लाचखोर ग्रामसेवकाचं नाव असून त्याने गावातील सहा जणांनी गेल्या वर्षी मंजूर झालेला गाय गोठा बांधलेला आहे आणि त्यांच्या मोजमाप कुस्तीवर सह्या करण्याचा मोबदला म्हणून प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे मागणी केली होती,आणि त्यानंतर तडजोडीअंती 3000 प्रमाणे 21 हजार रुपये लाच मागितली. मात्र पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावातल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठा त्रास असून त्यामुळं शेती करणं मुश्किल झालंय, मागील वर्षी रानडूकरांमुळे कपाशीचं पीक पूर्ण नष्ट झालं होतं त्यामुळं या वर्षी शेतकऱ्यांनी कपाशी ऐवजी तूर पिकाची पेरणी केली मात्र पेरणी होताच रानडुकरांनी तुरीचे संपूर्ण तासं उकरून खाऊन टाकलेत.
तुषार घुले या शेतकऱ्याचं चार एकर वरील तुरीचं पीक नष्ट झालं तर इतर शेतकऱ्यांनाही असाच त्रास झाला. यंदा तुरीचं बियाणे तब्बल ४०० रुपये किलोने शेतकऱ्यांना विकत घ्यावं लगलं होतं त्यामुळं या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज आळंदी नगरीत होतेय आजच्या माऊलींच्या या सोहळ्याला वैष्णवांचा महामेरु "योगी ज्ञानेश्वर" उपमा देण्यात आलीय
Vo :- माऊलींच्या या वैभवशाली सोहळ्यात संजीवन समाधी मंदिर विविध फुलमाळांची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण आळंदी मधील मंदिरात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात संत फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.