राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन वातावरण पेटले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून उपोषणाचे शस्त्र उपसत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला जेरीस आणले आहे. एकीकडे आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात याचिका दाखल केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपोषणास बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातील मराठा बांधवांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. जरांगेंच्या आवाहनानंतर गावागावांत आरक्षणासाठी आंदोलने होत असून राज्यात हिंसाचाराच्याही घटना घडत आहेत, याच पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे वारंवार मराठा आरक्षणाला विरोध करताना दिसत असून मनोज जरांगे यांच्यावर ते सातत्याने टीका करत आहेत. या भूमिकेमुळे काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलकांनी सदावर्तेंच्या गाड्यांचीही तोडफोड केल्याची घटना घडली होती. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.