Appasaheb Dharmadhikari Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Bhushan Award: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण, नवी मुंबईत रंगणार सोहळा!

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award : देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला.

कोमल दामुद्रे

Appasaheb Dharmadhikari News: महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य (Health) शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य दिले आहे. देशाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण देशाला काय देतो हे जास्त महत्त्वाचे ठरते असा धर्मजागृतीचा वसा त्यांनी लोकांपर्यंत मांडला. मानवता हाच धर्म असा लोककल्याणाचा मार्ग त्यांनी समोर ठेवला आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने (Award) सन्मानित करण्यात आलेले आहे. 2014 साली त्यांना डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली. 2017 मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले.

यापूर्वीही त्यांचे वडील श्रीनानासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण (Maharashta Bhushan) प्रदान करण्यात आला होता. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या रविवारी 16 एप्रिल ला नवी मुंबईत खारघर सेंट्रल पार्कमध्ये हा सोहळा रंगणार आहे.

या कार्यक्रम स्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करत आढावा घेतलाय. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेकडे मोठी जबाबदारी असून या दोन्हीही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक एक उपायुक्त नेमत खुद्द आयुक्तांनी या कार्यक्रमाची दखल घेतली पाहिजे.

या पुरस्कार वितरण समारोहाला अंदाजे २० लाखापेक्षा जास्त लोक येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. यासोबतच स्वच्छता, पाणी, वाहतूक कोंडी यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाहा देखील उपस्थित राहाणार आहे.

तसेच कार्यक्रमस्थळी 10 कार्डीऍक अॅबूलसन्स, 50 अॅबूलसन्स, 350 डॉक्टर असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी बेस्टच्या 500 बसेस, ठाणे मधून 200 बसेस सोडण्यात येणार असून खारघर रेल्वे स्टेशनपासून कार्यक्रम स्थळापर्यंत बसेसच नियोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाची जबाबदारी मंत्री उदय समंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांसाठी मोठी मदत, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Political News : ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT