Suresh Dhas Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Crime News Beed: बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी येथे १२ हजार रुपयांच्या कारणावरून तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली.

Alisha Khedekar

  • बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात १२ हजार रुपयांसाठी तरुणाचे अपहरण व मारहाण.

  • आरोपींनी आमदार सुरेश धस यांचे नाव घेत धमकावल्याचा दावा.

  • पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप.

  • वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

बीड जिल्ह्यातील गुंडगिरी काही नवीन नाही. अशातच शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी या गावात केवळ बारा हजार रुपयांच्या कारणावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडित तरुण शिवाजी शिंदे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तरी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आरोपी मोकाट फिरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार तरुण शिवाजी शिंदे याचे बारा हजार रुपयांच्या वादातून अपहरण करण्यात आलं. पीडिताला थेट घरातून उचलून हनुमान मंदिराजवळील परिसरात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर लोखंडी रॉडसह मारहाण करण्यात आली. मारहाणीचा उद्देश जीव घेण्याचा होता, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, “आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यामुळे माझ्या जीवाला सतत धोका आहे. माझ्यासोबत उद्या काहीही अनर्थ झाला तर यासाठी हेच लोक जबाबदार असतील. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यावर तात्काळ कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणात सर्वाधिक वादग्रस्त बाब म्हणजे आरोपींनी स्वतःला भाजपाचे आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत धमकावल्याचा दावा पीडिताने केला आहे. शिंदे म्हणाले, “मारहाण करताना त्यांनी आमदार सुरेश धस यांचे नाव घेतले आणि ‘आम्ही धसांचे कार्यकर्ते आहोत, आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही,’ असे म्हणत माझ्यावर हल्ला केला.” मात्र त्यांनी स्पष्ट केले की, “आमदार सुरेश धस हे अशा प्रकाराला कधीही प्रोत्साहन देणार नाहीत. परंतु त्यांच्या नावाचा वापर करून चुकीची कृत्ये करणाऱ्या लोकांना थारा मिळू नये.”

या प्रकरणी शिवाजी शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अद्यापही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे आरोपी मोकाट असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अशा मारहाणीच्या आणि अपहरणाच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे आकडे सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाची कार्यक्षमता आणि स्थानिक राजकीय दबाव यावर प्रश्न निर्माण केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT