Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Twins Birth : ९ महिन्यात ४२ जुळी मुलं, बीडमध्ये का वाढतेय जुळ्या मुलांची संख्या? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयात ९ महिन्यांत तब्बल ४२ जुळ्या बालकांचा जन्म झाला आहे. कृत्रिम गर्भधारणा आणि अनुवंशिकता हे कारण असल्याचे तज्ञांचे मत असून या घटनेमुळे रुग्णालय चर्चेचा विषय ठरले आहे.

Alisha Khedekar

  • बीड जिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांत तब्बल ४२ जुळ्या बालकांचा जन्म झाला आहे.

  • कृत्रिम गर्भधारणा आणि अनुवंशिकतेमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

  • काही प्रसूती सिजर तर काही नॉर्मल पद्धतीने पार पडल्या आहेत.

  • या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत आले आहे.

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालये आहेत जी रुग्णांना मोफत उपचार देतात. शिवाय, ते गर्भवती महिलांसाठी अनेक सुविधा देतात. मात्र महाराष्ट्रातील एक रुग्णालय सध्या चर्चेत आहे. या रुग्णालयात नऊ महिन्यांत ४२ जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. हे रुग्णालय महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जुळी मुलं जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या जुळ्या आणि तिळ्या मुलांचे जन्म दर सर्रास वाढताना दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यात जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या या बालकांच्या संख्येवरून कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आणि अनुवंशिकता या प्रमुख वैद्यकीय कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ही वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे.

दरम्यान जिल्ह्यात नऊ महिन्यात ४२ जुळ्या बालकांचा जन्म झाला आहे. यातील काहींची प्रसूती सिजर पद्धतीने झाली आहे तर काहींची नॉर्मल प्रसूती पद्धतीने झाले आहेत. मात्र यासाठी जिल्हा रुग्णालय देखील काळजी घेत आहे. त्याचबरोबर जुळे बालक होण हा योगायोग असतो. या संदर्भात विशेष काही वैज्ञानिक कारण नाही. आडवांस एज टेस्ट ट्यूब बेबी या पद्धतीचा वापर करणे आणि यामुळे जुळ्या बालकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुळी मुलं झाल्यानंतर बालकांचे वजन त्याचबरोबर लहान बाळांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार केले जात आहेत. ज्या बालकांचे वजन कमी आहे त्यांची विशेष काळजी घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, लसीकरण वेळोवेळी करणे हे महत्त्वाचे आहे. दरम्यान ही आकडेवारी मात्र जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways Update: प्रवाशी मित्रांनो कृपया लक्ष द्या! कोणालाच नाही मिळणार तिकीट; चौकशी असो की बुकिंग, सर्व कामं असतील ठप्प

Maharashtra Politics: आता राजसेना विरूद्ध शिंदेसेना, 'गडकिल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार'

Sanjay Raut : मोठी बातमी! PM मोदींनंतर CM फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस,VIDEO

ठाकरे बंधू आयोगाला कोर्टात खेचणार? मतदार याद्यातील घोळावरुन ठाकरे आक्रमक

Health Tips: 'या' कारणांमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जाणवतो थकवा

SCROLL FOR NEXT