Maharashtra Give It Up Scheme Saam Tv
महाराष्ट्र

Give It Up Scheme: देशात 'गिव्ह ईट अप' योजना सुरू करणारे महाराष्ट्र बनलं पहिलं राज्य, काय आहे ही योजना? जाणून घ्या

Maharashtra Give It Up Scheme: सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून 'गिव्ह ईट अप' योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शासनाची योजना किंवा लाभ परत करण्यासाठी प्रथमच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Give It Up Scheme:

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून 'गिव्ह ईट अप' योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शासनाची योजना किंवा लाभ परत करण्यासाठी प्रथमच पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाजप आमदर श्रीकांत भारतीय यांच्या मागणी नंतर सामान्य प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

महाडीबीटी पोर्टलवर गिव्ह ईट अप पर्याय उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत शासनाच्या ६५ योजनांसाठी हा पर्याय उपलब्ध होणार. आर्थिक सक्षम लोकांना शासनाचे लाभ नाकारण्यासाठी हा पर्याय उपलब्ध असेल. देशात गिव्ह ईट अप योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य बनले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत बोलताना भाजप आमदर श्रीकांत भारतीय म्हणाले आहेत की, मी महाराष्ट्र शासनाच मनपूर्वक अभिनंदन करतो. सामान्य माणसांसाठी एक जीआर काढला. मी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली होती की, ज्या ज्या लोकांना असं वाटतं की मला मिळालेलं अनुदान, मला मिळालेली सवलत की मी समाजासाठी परत करू शकतो. त्या अंतर्गत अशा प्रकारची सिस्टीमच शासनामध्ये उपलब्ध नव्हती.  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''आज महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला आणि त्यात कोणत्याही व्यक्तीला अनुदान परत करायच असेल तर तो ते परत करू शकतो, अशी सिस्टीम तयार केली. मी मनापासून शासनाचे अभिनंदन करतो आणि मी समाजाला देखील अपील करतो, की आपल्याला मिळालेल अनुदान जर आपल्याला नको असेल तर ते गरिबांसाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरेल.''

दरम्यान, याबाबत एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, ''उपमुख्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑगस्ट, २०२३ रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार Give It Up Subsidy या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या योजनांसाठी Give It Up Subsidy उपक्रम राबविण्यात येईल.''

यात लिहिलं आहे की, ''सध्यस्थितीत मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व ६५ योजनांमध्ये, तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वीत होणाऱ्या सर्व योजनांकरीता Give It Up Subsidy पर्यायाचे बटण/पर्याय महाआयटीमार्फत विकसीत करुन संबंधित योजनांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्जदाराने Give It Up Subsidy बटण/पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तूत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरीता pop-up window मध्ये सूचना येईल. सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर OTP प्राप्त होऊन, सदर OTP अर्जदाराने वेबसाईटवर नोंदविल्यानंतर Give It Up Subsidy ची प्रक्रिया पूर्ण होईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT