Aditya Thackeray criticizes CM Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde News: सफाईवरुन जुंपली! आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर, म्हणाले; 'फक्त हातसफाई केली त्यांना...

सुरज सावंत

Eknath Shinde on Devendra Fadanvis:

स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळचे मुख्यमंत्र्यांचे ट्रॅक्टर चालवण्याचे फोटो समोर आले होते. या फोटोंवरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Session) दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या अधिवेशनात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टिकेला उत्तर दिले.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

"आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) माहिती घेऊन माझावर टिका करायला हवी होती. मी तिथे नुसता ट्रॅक्टर चालवतं नव्हतो. त्यामागे जी मशीन होती. त्यातून दगड आणि प्लास्टिक हे वेगळं केलं जात आणि वाळू मोकळी राहते तसेच साफ सफाई होते. मी लोकांच्या दारात जाऊन मोहिम करतोय. डिप क्लिनिंग करतोय. यांनी आतापर्यंत फक्त हातसफाई केली आहे त्यांना काय कळणार?" असा टोला त्यांनी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी...

"हे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. यासाठीच आम्ही विविध निकष बदलले. NDRF चे निकष बदलून वाढीव मदत दिली.केंद्राने शेतकऱ्यांना ६ हजार मदत जाहिर केल्यावर राज्यानेही पुढाकार घेऊन ६ हजार देण्याची घोषणा केली. पंचनामेही युद्ध पातळीवर काढण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत..." असे मुख्यमंत्री म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

Breaking News Live : नौदल दिनानिमित्त कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

Nana Patole : ''त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका..''; नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT