Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

अजित पवारांचा एक प्रश्न, शिंदे सरकारची दमछाक; विधानसभेत नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra assembly session live : सध्या विधीमंडळाचं पावसाठी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे सरकारला (Eknath Shinde) धारेवर धरलं. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे सरकारला उत्तर देता आलं नाही. त्यामुळे उत्तर नसल्याने पहिलाच प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर ओढवली. (Maharashtra assembly Monsoon session news updates)

अजित पवारांनी कोणता प्रश्न विचारला?

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचारला होता. पण याची उत्तरं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, आपल्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली. सोमवारी या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे.

हत्तीरोग नियंत्रण यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, त्यापैकी भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिंबंक उपाययोजनांसाठी पालघर जिल्ह्यासाठी मंजूर निधी व वर्षभरात खर्च झालेला निधी या प्रश्नांची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता आली नाहीत. (Monsoon session of maharashtra assembly 2022)

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत. असाच काहीसा प्रत्यय अजित पवार यांच्या या प्रश्नावरून येतो आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Today's Marathi News Live: बीडमध्ये तिहेरी अपघातात; 1 ठार तर 3 जण जखमी

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT