Maharashtra Assembly Monsoon Session Updates : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चहापानासाठी सह्याद्री अतिथीगृहावर आमंत्रित केले आहे. तत्पुर्वी महाविकास आघाडीच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरणार आहे.
पक्षफुटीमुळे कमकुवत झालेल्या विरोधी पक्षासमोर सरकारची कोंडी करण्याचं मोठं आवाहन असणार आहे. सरकारला घेरण्याची संधी आम्ही सोडणार असे नाना पटोले आणि आंबादास दानवे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर विधिमंडळातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधक सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार असून सुनिल तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. प्रतोद अनिल पाटील हे या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहण्याबाबत नोटीस काढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण यावरून अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत हे कळणार आहे.
अजित पवार गटाकडून व्हीप बजावला जाणार
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. प्रतोद अनिल पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्हीप बजावण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी व्हीप नाकारला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी मागणी अनिल पाटील यांनी दिली आहे. (Tajya Marathi Batmya)
व्हीप नाकारला तर पक्ष श्रेष्टी योग्य निर्णय घेतील - अनिल पाटील
अनिल पाटील म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षापासून व्हीप बजावण्याचे काम किंवा पक्षादेश देण्याचे काम मी सातत्याने करत आहे. त्यापद्धतीने सगळ्या आमदारांना नेहमीप्रमाणे व्हीप बाजवला जाईल. पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी माझी येणाऱ्या काळासाठी व्हीप म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे मी बजावलेला व्हीप नाकारण्याची काही संबंध नाही. परंतु नाकारला तर त्याबाबत योग्य तो निर्णय पक्ष श्रेष्टी घेतील असेही त्यांनी सांगितले. (Latest Political News)
राष्ट्रवादी गिरवणार शिवसेनाचा कित्ता
उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या व्हीपचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावला जाऊ शकतो. शिवसेनेत फूट पडली तेव्हा देखील शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता. तोच कित्ता आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट गिरवणार का हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे व्हीप जितेंद्र आव्हाड आहेत, तर अजित पवार गटाचे व्हीप अनिल पाटील आहेत. त्यामुळे कोणाचा व्हीप ग्राह्य धरायचा हा पेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर असणार आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.