Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: मागील दिड वर्षात महाराष्ट्राच्या राजकरणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मागील वर्षी शिवसेनेत मोठं बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेना पक्ष आणि चिन्हही मिळवलं.
अशातच 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार शिंदे यांना पाठिंबा देणार की ठाकरे यांना? हे जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी राष्ट्रवादी Next 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे.
कसं करण्यात आलं सर्वेक्षण?
हे सर्वेक्षण राज्यातील सगळ्या मतदार संघात करण्यात आला आहे. यामध्ये सगळ्या लिंगाचे म्हणजे स्त्री-पुरुष आणि सगळ्या वयोगटातील मतदारांचा समावेश आहे. यात राज्यातील 73 हजार नागरिकांनी भाग घेतला आहे. (Latest Marathi News)
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल?
या सर्वेक्षणात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये 26.8 टक्के लोकांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. तर 19.1 टक्के लोकांनी काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) 14.9 टक्के, राष्ट्रवादी (अजित पवार) 5.7 टक्के, शिवसेना (एकनाथ शिंदे) 4.9 टक्के, शिवसेना (उद्धव ठाकरे) 12.7 टक्के, मनसे 2.8 टक्के, वंचित 2.8 टक्के आणि इतर 10.3 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
यामध्ये महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जरी पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवलं असलं तरी, मतदार हे मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसलं आहे. या सर्वेक्षणात शिंदे यांच्या पाठीशी 4.9 टक्के मतदार दिसतात, तर ठाकरे यांच्या पाठीशी 12.7 टक्के मतदार दिसतात.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कुणाला पसंती द्याल?
या प्रश्नचं उत्तर देतानाही यात 8.5 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे. तर 21.9 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दर्शवली आहे. यातच उद्धव ठाकरे यांना तब्बल 19.4 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.