Maharashtra Assembly Monsoon Session 
महाराष्ट्र

Monsoon Session Video: पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी; विरोधक ड्रग्ज, महागाई, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरणार

Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे महाविकासआघाडीचे नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून धारेवर धरणार आहे.

Bharat Jadhav

रुपाली बडवे, साम प्रतिनिधी

मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले होते. महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीतील नेते चार्ज झाले आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या अधिवेशनात पाहायला मिळेल. आदल्या दिवसांपासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विरोधक राज्यातील ड्रग्ज, महागाई, शेतकरी, आणि पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहे.

तर लोकसभेतील पराभवाने खचलो नसल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा असेल. विरोधकांची एकी बघता सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न होऊ शकतात. दरम्यान यंदा ३ आठवडे चालणार्या या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. गुरुवारी २७ जूनपासून सुरू होणार्‍या अधिवेशनाचा समारोप १२ जुलैला होणार आहे. साधारण ३ आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने दिलेले चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारत सरकारविरोधात शड्डू ठोकला. चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला होता.

विरोधकांच्या बहिष्कारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सडेतोड उत्तर दिलं होतं. विरोधकांना चर्चा करायची नाही. ते चर्चेपासून पळ काढतात असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता. तर विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी महायुतीचं सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे, या सरकारने शेतकऱ्यांचे मारेकरी असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, फेब्रुवारीत जेव्हा राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला नव्हता. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात हा पाहणी अहवाल सादर करण्यात येईल. या अहवालाच्या निमित्ताने राज्य आर्थिक सामाजिक प्रगतीच्या आघाडीवर आहे की पिछाडीवर आहे, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर ते मुंबई विमानसेवा होणार सुरू

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

Nashik News: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनावर फेकले कांदे; नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप उसळला|VIDEO

CM Fadnavis: वाद निर्माण झाला तर विचार करावा लागेल; पोस्ट कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंसह मंत्र्यांना झापलं

Dengue In Monsoon: पावसाळ्यात डेंग्यूपासून कसा कराल बचाव? फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT