Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Security : मनोज जरांगे यांची सुरक्षा वाढवली, अंतरवालीत ड्रोनच्या घिरट्यांनंतर सरकारचा निर्णय, असं असेल सुरक्षा कवच!

Priya More

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावात ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार घडला होता. याचा व्हिडीओ देखील समोर आला होता.

अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनच्या घिरट्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आजच्या कामकाजादरम्यान अंतरवाली सराटीचा मुद्दा मांडला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती दिली.

'याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे. रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण झालं आहे. त्याचे तीन पथकामार्फत चौकशी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवली आहे. ४ पोलिस आणि १ पोलिस वाहन जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत‌ तैनात राहतील.', अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ केल्यामुळे आता त्यांच्यासोबत चार शस्त्रधारी पोलिस असणार आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावामध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले होते. याबाबत ग्रामस्थांनी पोलिांकडे देखील तक्रार केली होती. गावामध्ये कोणाकडून रेकी केली जात आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला होता. यासाठी अंतरवाली सराटीमधील जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी आंदोलन देखील केले होते.

दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सांगितले होते की, 'मला मारणे एवढे सोपे नाही. माझ्या मागे राज्यातील ६ कोटी मराठा बांधव आहेत. जो कुणी ड्रोन उडवून हे काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने आमच्या नादाला लागू नये. ड्रोन आले होते. ते खूपच उंचावर होतं. ड्रोन टप्प्यातच येत नाही. नाहीतर एका गोट्यातच त्याला खाली पाडणार.', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Marathi News Live Updates : चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT