Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: 'विरोध करणं विरोधकांचे कामच', अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवारांचे उत्तर; टीका करणाऱ्यांना सुनावलं!

Gangappa Pujari

सुनिल काळे, मुंबई|ता. ५ जुलै २०२४

राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. मागच्या आठवड्यात अधिवेशनामध्ये राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र ही विधानसभेआधीची घोषणाबाजी असल्याचे म्हणत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. ज्यामध्ये त्यांनी १० वर्षांच्या अनुभवातील सर्वोत्तम बजेट असल्याचे सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

"मी अर्थसंकल्प मांडला, त्यावर काहींनी टीका केली. विरोधकांचे विरोध करणं काम आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीही सांगितल्या. बजेट फुटल्याचे वक्तव्य काही सदस्यांनी केले. वडेट्टीवार, जयंत पाटील हे सिनियर असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनियता राखलेली आहे," असे अजित पवार म्हणाले.

"सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले. जयंतरावांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. मी १० वेळा बजेट मांडलं. त्यामुळं थोडा बहुत अनुभव आहे. महाविकास आघाडी असो महायुती असो मी दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडला. पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात, तिकडनं मांडला की इकडचे टीका करायचे," असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.

१५ ऑगस्ट पर्यंत १ लाख ९ हजार लोकांना सरकारी नोकरीत लावलेले असेल. मी अर्थसंकल्प मांडताना दुसरीकडे काम सुरु आहे. राज्य झपाट्याने पुढे न्यायचे आहे. राज्याची अर्थव्यवस्था चांगल्या वळणार आहे. राजकारण करा पण त्यावरुन राज्याची बदनामी करु नका, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

SCROLL FOR NEXT