ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ड्रायफ्रुट्समध्ये असणारे अक्रोड आपल्या शरीरासाठी फार गुणकारी आहे.
अक्रोडमध्ये आरोग्यदायी गुणधर्म असल्याने ते आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असते.
आरोग्यदायी अक्रोडचा उपयोग चॅाकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक, इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो.
दररोज आहारात अक्रोड खाल्याने आपल्या शरीरवरील ताण-तणाव कमी होत असतो.
गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले अक्रोड हृदयविकार, मधुमेह,आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर लाभदायक आहे.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॅालिफेनॅाल्स असे पोषक घटक असतात.
दातात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी अक्रोडची पाने खा.
जर शरीरावरील एखाद्या भागावर जळजळ किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडचा लेप लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT : फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच