राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सत्ता स्थापनेसाठी विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही गट आमने सामने आलेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दाणवे यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टिकास्त्र डागलं आहे. बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारने स्वतःच्या जाहिरात बाजी आणि घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केले आहे. अनेक ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला यांच्याकडे पैसा नाही, अशा शब्दांत दानवेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. प्रत्येक जिल्हयात बंडखोरांची लागण महायुतीला लागलेलीच आहे. पण मला वाटतं कुणी काही केलं तरी जनता महाविकस आघाडीच्या बाजूने आहेच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर बोलताना दानवेंनी म्हटलं की, एकत्रित सर्व जागावाटप उमेदवार समोर आलेलं आहे. या घोटाळेबाज सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही मैदानात आहोत.
घराणेशाहीवरून भाजपने केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना दानवेंनी म्हटलं की, आरोप करताना भाजपने स्वतःकडे पाहिलं पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सत्तेतील अन्य काही नेत्यांनी देखील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर घराणेशाईचा ठपका ठेवला होता. त्यावर अंबादास दानवेंनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.