कोल्हापूर : जिल्ह्यातील उत्तर मतदारसंघात विधानसभा मतदारसघात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या विधानसभा मतदारसंघात मधुरिमाराजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मधुरिमाराजे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे यांनी माघार घेतली आहे. अर्ज माघार घेण्यासाठी स्वत: मधुरिमाराजे छत्रपती, खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार घेतल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापुरात मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील हे मालोजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्याची माहिती हाती आली आहे. यावेळी सतेज पाटील यांनी शाहू महाराजांकडेही नाराजी व्यक्त केली. तुम्ही केलेलं बरोबर नसून माघार घ्यायची होती तर आधीच का सांगितलं नाही? मला तोंडघाशी पाडलं? माझी नाचक्की का केली? असे सवाल सतेज पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज आणि मालोजीराजे यांना केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात दुसऱ्यांदा उलटफेर पाहायला मिळाला. या विधानसभा निवडणुकीत मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसने आता राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अपक्ष अर्ज भरला आहे. दरम्यान, ऐन मोक्याच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.