Maharashtra Election Maharashtra Election
महाराष्ट्र

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत हे लहान पक्ष सुद्धा ठरू शकतात 'गेम चेंजर'; कसे ते जाणून घ्या!

Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या घटकांमध्ये जरी निवडणूक होणार असली तरी काही लहान पक्ष आणि लोकनेते या निवडणूकीत महत्त्वाची भूमीका बजावणार

Namdeo Kumbhar

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणूकीत दोन मोठ्या घटकांपैकी एकाची सत्ता स्थापन होऊ शकते. भाजपप्रणित महायुती आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी हे या निवडणूकीचे दोन मोठे घटक आहेत. महाविकास आघाडी आणि  महायुती या दोन मोठ्या घटकांमध्ये जरी निवडणूक होणार असली तरी काही लहान पक्ष आणि लोकनेते या निवडणूकीत महत्त्वाची भूमीका बजावणार आहेत. ही लहान पक्ष वेळ पडल्यास किंगमेकरची भूमीका देखील बजावू शकतात. 

असदुद्दीन ओवेसीचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम), राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी  हे पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतात किंवा किंगमेकर किंगमेकर देखील ठरू शकतात .

लहान पक्ष आणि अपक्षांना जवळपास ३० जागा मिळू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात त्रिशंकू लढत दिसली तर हे आमदार निर्णायक भूमिका बजावतील. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला 288 सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होत असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेची चावी लहान पक्षांकडे 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत, लहान पक्षांनी 29 जागा जिंकल्या आणि त्यांचे उमेदवार 63 मतदारसंघात उपविजेते ठरले, यामुळे यंदाच्या निवडणूकीत मोठ्या पक्षांची धाकधूक अधिकच वाढली आहे. महाराष्ट्रात, बहुतेक मतदारसंघांमध्ये सुमारे 4 लाख मतदार आहेत, आणि काही मतदारसंघांमध्ये सुमारे 3 लाख आहेत. सरासरी 60 टक्के मतदानासह, प्रत्येक मतदारसंघात अंदाजे 2.5 लाख मतदान होईल. मतविभाजनामुळे प्रत्येक जागेवर सुमारे एक लाख मते विजयी करू शकतात. अशा परिस्थितीत, निवडक प्रादेशिक किंवा शहरी उपस्थिती असलेले मनसे आणि एआयएमआयएम सारखे छोटे पक्षही अनेक जागांवर निर्णायक ठरू शकतात.

मागील निवडणुकांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण अधिकच विस्कळीत आणि गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक मतदारसंघात मोठ्या पक्षांना बंडाळीची छळ देखील सहन करावी लागली आहे. सुमारे 25 ते 30 जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळण्याची अपेक्षा आहे, जे निर्णायक ठरू शकतात.

मनसेची भूमिका अस्पष्ट

महाराष्ट्राच्या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा तिसरा खेळाडू म्हणून उदयास आलेला पक्ष म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मनसे मुंबईत 25 जागा लढवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात किमान 36 विधानसभा जागांवर तो महत्त्वाचा घटक असेल अशी अपेक्षा आहे. मुंबईतील 25 पैकी 10 जागा महायुतीकडून शिंदे सेना 12 तर भाजप 10 जागा लढवत आहेत. तर दुसरीकडे मनसेला भाजपला अनुकूल पक्ष म्हणून पाहिले जाते. माहीम मतदारसंघात भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Edited By - नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT