Gurupadeshwar Maharaj Attacked Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News: शिवस्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयामध्ये उपचार सुरू

Gurupadeshwar Maharaj Attacked: वसमतमध्ये निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर गुरुपादेश्वर महाराज गिरगाव येथील मठाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Priya More

Maharashtra Assembly Election: मराठवाड्याच्या कळमनुरीनंतर आता हिंगोलीतील वसमतमध्ये देखील उमेदवारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. वसमत विधानसभेच्या निवडणूक मैदानात उभे असलेल्या शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरूपादेश्वर महाराजांवर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूपादेश्वर महाराजांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्याच्या कारच्या काचा फुटल्या असून यामध्ये गुरुपादेश्वर महाराज जखमी झाले आहेत. गुरुपादेश्वर महाराज यांच्या शिष्याने ही माहिती दिली.

वसमतमध्ये निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यानंतर गुरुपादेश्वर महाराज गिरगाव येथील मठाकडे जात होते. त्यावेळी पळसगाव परिसरामध्ये अचानक रस्त्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली आणि दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरू केले आहे. सध्या गुरुपादेश्वर महाराज यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील मिळाली आहे. पण या घटनेमुळे गुरुपादेश्वर महाराज यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! मुंबईत ‘केमिकल आंबा’ घोटाळा उघड; खरेदीआधी ही बातमी वाचाच, अन्यथा...

Summer Hair Fall Control Tips: उन्हाळ्यात केस गळतीवर 5 सर्वात सोपे उपाय

Maharashtra News Live Update:नांदेड जिल्ह्याचा तापमान 43° अंश डिग्री सेल्सिअसवर

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

11th Online Admission : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली

SCROLL FOR NEXT