akola west vidhan sabha Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अकोला पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट; वंचितच्या उमेदवाराने अचानक घेतली माघार, सोशल मीडियात वेगळीच चर्चा

akola west vidhan sabha : अकोला पश्चिम मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वंचितच्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही प्रतिनिधी

अकोला : लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर आता अकोला पश्चिम मतदारसंघातही तसाच प्रकार घडला आहे. अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. डॉ. जिशान हुसने यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघार घेतलेले वंचितचे उमेदवार डॉ जिशान हुसेन आणि काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अकोला पश्चिम'मधून वंचितचे उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाये. त्यानंतर आता साजिद खान पठाण आणि डॉ. हुसेन यांचा सोबत असलेला फोटो व्हायरल होतोय. काल रात्रीचा हा फोटो असल्याच समजत आहे. सामाजिक कार्यकर्ते जावेद जकेरिया यांच्या मुलीच्या लग्नातील हा फोटो आहे. या फोटोमधून दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे.

डॉ. जिशान हुसेन हे काँग्रेसचे नेते आहे. ते काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांचं तिकीट नाकारलं. हुसेन यांची उमेदवारी नाकारून साजिद खान पठाण यांना संधी दिली. त्यामुळे नाराज असलेल्या हुसेन यांनी बंडखोरी केली. त्यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेर आज अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी डॉक्टर हुसेन यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वंचितला या मतदारसंघात उमेदवार राहिला नाही. आता या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठिंबा देते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातही ठाकरे गटाच्या शिवसेनेतून बंडखोरी करूत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार संतोष सोमवंशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मध्यस्थीने संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. तर औसा विधानसभेत ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांना संतोष सोमवंशी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

अकोल्यातील बंडखोरी

1) अकोला पश्चिम विधानसभा

बंडखोरी कायम असलेले उमेदवार :

1) राजेश मिश्रा (अपक्ष) : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख.

1) हरीश आलिमचंदाणी (अपक्ष) : माजी नगराध्यक्ष, भाजप.

2) डॉ. अशोक ओळंबे (सध्या प्रहारचे उमेदवार) : प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी महानगराध्यक्ष भाजपचे.

माघार :

1 ) प्रकाश डवले (अपक्ष) : शिवसेना ठाकरे गट बंडखोर.

2) संजय बडोणे (अपक्ष) : महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती. भाजपचे पदाधिकारी.

3) डॉ. जिशान हूसेन (वंचितचे उमेदवार) : महापालिका माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खारघर तळोजा जेल रोडजवळील बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Wrestler Divorce : नात्याला कुणाची नजर लागली? सायना नेहवालनंतर आणखी एका खेळाडूचा घटस्फोट; लग्नाच्या दोन वर्षांनी संसार मोडला

Kitchen Cleaning Tips: सिलिंडरच्या गंजाने किचनची टाइल्स खराब झालीये? 'या' सोप्या पद्धतीने काढा डाग

Food Adulteration: तुमच्या ताटातील पनीरमध्ये कोण विष टाकतंय? भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

SCROLL FOR NEXT