Thane Election  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचा गड भेदण्यासाठी पवार-ठाकरेंचं तगडं प्लॅनिंग, शिंदे-भाजप काय तोडगा काढणार?

Maharashtra assembly election 2024 : ठाण्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी मविआकडून जोरदार तयारी कऱण्यात आली आहे. उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा बालेकिल्ला ठाणे भेदण्यासाठी महाविकास आघाडीकडून चाचपणी करण्यात येत आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपची मोठी ताकद आहे. ठाण्यातील विधानसभेच्या १८ जागांसाठी मविआकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून महायुतीचा बालेकिल्ला भेदण्यासाठी विशेष प्लॅन आखला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकरेंनी सर्वाधिक जागा जिंकून महायुतीचा किल्ला भेदावा, यासाठी प्लॅनिंग आखलं जात असल्याचे समोर आलेय. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

विधानसभेच्या १८ जागांसाठी मविआकडून चाचपणी केली जात आहे. ठाण्यात ठाकरे सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते पाच जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय समाजवादी पक्षाला एक जागा मिळाले. उर्वरित १० ते ११ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील, असे समोर आलेय.

शरद पवारांकडे कोणत्या जागा ?

ठाण्यातील १८ विधानसभा जागांपैकी चार ते पाच जागांवर शरद पवार यांचे उमेदवार मैदानात असतील. कळवा-मुंब्रा, बेलापूर, उळ्हासनगर आणि शहापूर या चार जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यासाठी एकमत झालेय. ऐनवेळी मुरबाड मतदारसंघ शरद पवार यांना सोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसला किती जागा ?

ठाण्यात काँग्रेसला तीन जागांवर मसाधान मानावे लागणार आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व या तीन जागा काँग्रेसला सोडण्याविषयी चर्चा सुरु असल्याचं समोर आलेय.

सपाला एक जागा -

भिवंडी पूर्वेत सध्या समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार आहेत. ही जागा समाजवादी पक्षाला सोडली जाईल, असे मविआमधील एका नेत्यानं सांगितलेय.

नाराज गळाला लावण्यासाठी प्लॅनिंग -

महायुतीमधील नाराजांना गळाला लावण्याचा प्लॅन मविआने आखला आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटामध्ये उमेदवारीवरुन नाराजी आणि वाद आहे. या मतदारसंघातील नाराज उमेदवाराला आपल्या पक्षात घेण्यासाठी मविआकडून योजना आखली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT