Survey 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नव्या सर्व्हेनं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं! महायुती १२० च्या आत, मविआला मिळणार 'इतक्या' जागा

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. असंच एक सर्वेक्षण समोर आलंय, ज्यामध्ये मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं दिसतंय. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीला राज्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण 'लोक पोल'ने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये स्पष्ट दिसतंय की, महाविकास आघाडी चांगल्या फरकाने एनडीचा पराभव करू शकते, जवळपास २० जागांचं हे अंतर राहण्याची शक्यता आहे.

राज्यात नुकतेच झालेल्या 'लोक पोल'च्या ताज्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, एनडीए म्हणजेच महायुतीला महाराष्ट्रात ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळू (Maharashtra Politics) शकतात . त्याचबरोबर इतर पक्षांना ५ ते १८ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. एनडीएची मतांची टक्केवारी ३८ ते ४१ टक्के तर महाविकास आघाडीची ४१ ते ४४ टक्के आणि इतरांची १५ ते १८ टक्के असण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वेक्षण कसे केले?

निवडणुकांशी संबंधित जनमत चाचण्या आणि अंदाज वर्तवणाऱ्या 'लोक पोल'ने जवळपास महिनाभर राज्यात ग्राउंड सर्व्हे केलाय. याचा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात (Maharashtra Assembly Election 2024) आलाय. सर्वेक्षणादरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे पाचशे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण सर्वेक्षणामध्ये एकूण दीड लाख नमुने घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी

महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा (MVA Vs Mahayuti) आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने बहुमतासाठी १४५चा जागांचा आकडा आवश्यक आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप असे तीन घटक पक्ष (Election 2024 Poll survey) आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा समावेश आहे. लोकसभेची रणधुमाळी पाहाता राज्यात विधानसभेसाठी देखील चांगलंच टशन रंगणार असल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: जरांगेंकडे सरकारचं दुर्लक्ष, 'लाडकी बहीण' योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार, सकल मराठा समाजाचा इशारा

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

BIS Recruitment: भारतीय मानक ब्युरोमध्ये नोकरीची संधी; मिळणार ७५००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Raj Thackrey :''.. मग आधी पालिका निवडणुका घ्या!'', राज ठाकरेंची पोस्ट

IPL 2025 Auction: IPL 2025 स्पर्धेचं ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार? मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT