Jalgaon Money Seized Saamtv
महाराष्ट्र

Jalgaon Cash Seized: कारमध्ये सापडलं तब्बल दीड कोटींचं घबाड! जळगावमध्ये मोठी कारवाई; पैसे कुणाचे? तपास सुरु

Jalgaon Money Seized: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत कारवाई करण्यात आली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Jalgaon Money Seized News: विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर सुरक्षेसाठी तसेच आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. राज्यात येणाऱ्या, जाणाऱ्या गाड्यांमधून अवैध दारूचा पुरवठा, रोख रक्कम अशा वस्तूंची तपासणी केली जात आहे. अशातच जळगावच्या अमळनेर तालुक्यात तपासणी नाक्यावर पोलिसांच्या तपासणी वाहनात दीड कोटी रुपयांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अमळनेर तालुक्यात १६ लाख सापडले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील चोपडाई तपासणी नाक्यावर पोलीस तपासणी करताना एका वाहनात १६ लाख ३८ हजार रुपयांची रोख रक्कम आढळल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करत कारवाई करण्यात आली आहे.

पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली. रक्कम दहा लाखाच्यावर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. ज्या वाहनात रक्कम आढळली ते वाहन चोपडा येथील असून रक्कम ही कापूस व्यापाऱ्याची असल्याचे सांगण्यात येत आहे.

कासोदामध्ये तब्बल दीड कोटींची रक्कम

दुसरीकडे एरंडोल तालुक्यात कासोदा गाव येथे एका कारमध्ये दीड कोटीची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळा मतदार संघातील कासोदा गावात पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी दरम्यान कारमधून तब्बल दीड कोटींची रोकड जप्त केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा गावातील फरकांडे चौफुलीवर पोलिसांचे पथक सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाकाबंदीसाठी थांबलेले होते. याचवेळी एका क्रेटा कारची तपासणी केली असता पोलिसांना तब्बल एक कोटी 45 लाखाची रोकड सापडली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ही रोकड नेमकी कोणाची आणि कशासाठी आणली होती? याचा खुलासा होऊ शकला नव्हता. पोलीस याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT