Maharashtra Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Beed Assembly Election: इकडे विधानसभेची रणधुमाळी, तिकडे बीडमध्ये भाजपला गळती, महायुतीचं टेन्शन वाढलं!

Maharashtra Assembly Election 2024: भाजपाच्या बीड जिल्ह्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडत आहे. तर याच जिल्ह्यात आता शरद पवार गटाचे पारडे जड होत आहे.

Priya More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला गळती लागली आहे. विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा प्रदेश सचिवांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बीडमध्ये महायुतीचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यामध्ये भाजपला गळती लागली आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या पहिल्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता भाजपाचे प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपाच्या बीड जिल्ह्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडत आहे. तर याच जिल्ह्यात आता शरद पवार गटाचे पारडे जड होत आहे. गेवराई विधानसभेचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपामधील अंतर्गत गटबाजीवर वक्तव्य करत भाजपला रामराम ठोकला.

त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ माजी आमदार संगीता ठोंबरे रमेश आडसकर आणि आता भाजपाचे प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा सोपविला आहे. दरम्यान या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यात मुंडेंना मात्र राजकीय अडचणींना सामोरे जावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyayak Patani News : कारंजामधून भाजपला धक्का, ज्ञायक पाटणींचा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; 'या' 9 उमेदवारांना मिळणार संधी | Video

Maharashtra News Live Updates : पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना उमेदवारी

Akkalkuwa Vidhan Sabha : अक्कलकुवा विधानसभेसाठी पेच कायम; महायुतीचा उमेदवार अद्याप ठरेना

VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT