Maharashtra Election: सुधीर गाडगीळांची हॅटट्रिक होणार? भाजप-काँग्रेससमोर बंडखोरीचं आव्हान?

Maharashtra Election: क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सांगलीत भाजपने सुधीर गाडगीळांना उमेदवारी दिलीय..तर काँग्रेसमध्ये अजूनही उमेदवार निश्चित झाला नाही. त्यामुळे सांगलीत राजकीय आणि जातीय समीकरण नेमकं कसं असणार आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
Maharashtra Election:
Maharashtra Election:
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

क्रांतीकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सांगलीत भाजपने सुधीर गाडगीळांना उमेदवारी दिलीय..तर काँग्रेसमध्ये अजूनही उमेदवार निश्चित झाला नाही. त्यामुळे सांगलीत राजकीय आणि जातीय समीकरण नेमकं कसं असणार आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Maharashtra Election:
BJP Candidate Second list : भाजपची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळालं विधानसभेचं तिकीट?

काँग्रेस आणि शेकापचं वर्चस्व असलेल्या सांगली मतदारसंघाला भाजपने 2009 मध्ये पहिल्यांदाच खिंडार पाडलं. तर सलग तीन वेळा या मतदारसंघावर भाजपने आपलं वर्चस्व राखलंय.. मात्र 2014 मध्ये सुधीर गाडगीळांना मिळालेल्या लीडमध्ये 2019 ला घसरण झाली. मात्र 2019 मध्ये कुणाला किती मतं मिळाले होते? पाहूयात

Maharashtra Election:
Congress third list : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा

सांगलीत विश्वजित कदम आणि विशाल पाटलांसारखे हेवीवेट नेते असतानाही सांगलीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तर उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीचा इशारा काँग्रेसच्या मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटलांनी दिलाय तर बंडखोरांमुळे भाजपचंही टेंशन वाढलंय.

सांगलीत बंडखोर वाढवणार टेंशन

पृथ्वीराज पाटील, इच्छुक, काँग्रेस

जयश्री पाटील, इच्छुक, काँग्रेस

पप्पू डोंगरे, अपक्ष, भाजप

सांगली मतदारसंघ संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात जातीय समीकरण नेमकं कसं आहे? पाहूयात.

सांगलीचं जातीय समीकरण?

मराठा- 85 हजार

मुस्लीम - 46 हजार

ओबीसी- 54 हजार

अनुसुचित जाती आणि जमाती- 70 हजार मतं

सांगलीत जातीपातीपेक्षा बेरजेचं राजकारण महत्वाचं ठरतं. त्यामुळे बंडखोरांची बंडखोरी शमवून बेरजेचं राजकारण कऱण्यात काँग्रेस यशस्वी ठरणार की भाजपचे सुधीर गाडगीळ हॅट्रिक करणार? यावर सांगलीच्या विजयाचं समीकरण अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com