VIDEO : मित्रपक्षानेच दिला भाजपला धक्का? माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी शिंदे गटात करणार प्रवेश

Kannad Assembly Constituency : माजी खासदार रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांनी आज महायुतीतीत शिंदे गटात प्रवेश केला असून त्या छ. संभाजीनगरमधील कन्नड विधानसभेची जागा लढवणार आहेत.

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महायुतीत कन्नडची जागा शिवसेना लढणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. कन्नडमधुन माजी केंद्रीय मंजी रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजना जाधव या धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढणार आहेत. आज 12 वाजता मुंबईत किंवा ठाण्यात संजना जाधव यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्या पक्ष प्रवेशासाठी संजना जाधव आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दीड वाजता विमानाने मुंबईत दाखल झाल्या असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com