BJP Rebel Candidate Vishal Parab Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या कारवर हल्ला, सावंतवाडीमध्ये मध्यरात्री काय घडलं?

BJP Rebel Candidate Vishal Parab: सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनजवळविशाल परब यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. बांबूने त्यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Priya More

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सावंतवाडीतील मळगाव स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या हल्ला प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हे मध्यरात्री आपल्या घरी जात होते. त्याचवेळी सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनजवळ त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. बांबूने त्यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोर हल्ला करून जंगलात पळून जात असताना स्थानिकांनी हल्लेखोराला शिताफीने पकडले असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशाल परब यांच्या कारवर हल्ला करणारा आरोपी झारखंड राज्यातील असल्याचे समजते. हल्ल्याच्या प्रयत्नानंतर विशाल परब यांच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गर्दी केली होती. सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबतची तक्रार देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, 'कोणी कितीही दहशत माजवली तरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही.', असे विशाल परब यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT