Shahapur News : कारमध्ये सापडले कोट्यवधीचे घबाड; कसारा घाटात पोलिसांच्या तपासणीत सापडली रक्कम

Shahapur News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने राज्य व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहन तपासणी केली
Shahapur News
Shahapur NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

शहापूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहन तपासणी केली जात आहे. त्यानुसार मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ करण्यात आलेल्या तपासणीत कारमध्ये लाखोंचे घबाड आढळून आले आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलिसांकडून (Police) नाकाबंदी करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने राज्य व जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहन तपासणी केली जात आहे. त्यानुसार शहापूर तालुक्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या (Kasara Ghat) पायथ्याशी असलेल्या चिंतामण वाडी पोलिस चौकीजवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणीत कारमध्ये रोख रक्कम आढळून आली आहे. 

Shahapur News
Tuljapur Vidhan Sabha : बाल्लेकिल्ला टिकवूनही माझ्यावर अन्याय झाला, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली खदखद

रक्कम मोजणीचे काम सुरु 

सदरची कार नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना कसारा घाटच्या खाली चिंतामण वाडी येथील पोलिस चौकी जवळ कसारा पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली- या तपासणीत कारमध्ये राख रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी सदरची कार ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून रक्कम मोजण्याचे काम सुरू केले आहे. हि रक्कम कोट्यवधींत असण्याची शक्यता वर्तविली जात असून सध्या भरारी पथकांकडून पैश्याची मोजणी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com