Aaditya Thackeray targets Eknath Shinde during monsoon session over alleged BMC corruption and Marathi neglect. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मराठीचं राजकारण, कंत्राटदारांची 'मिठी',विधानसभेत ठाकरे - शिंदे भिडले

Political War Erupts in Assembly: पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे एकमेकांशी भिडल्याचं समोर आलंय...मात्र सभागृहात नेमकं काय घडलं होतं?

Omkar Sonawane

विधीमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गाजला तो ठाकरे आणि शिंदेंच्या खडाजंगीने.....विधानसभेत नियम 293 च्या प्रस्तावावर उत्तर देतांना एकनाथ शिंदेंनी मराठीच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधूंना डिवचलं... एवढंच नाही तर शिंदेंनी मिठी नदीच्या कंत्राटाचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

दुसरीकडे भास्कर जाधवांनीही 2014 पासून नगरविकास मंत्री असल्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवलीय..खरंतर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष टोकाला गेलाय.. त्यातच आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावरुन शिंदेंची कोंडी केलीय.. आतापर्यंत ठाकरेंनी शिंदेंवर कोणते आरोप केलेत? पाहयात...

ठाकरेंनी शिंदेंवर केलेले आरोप

मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणात घोटाळ्याचा आरोप

मेट्रोशी संबंधित भ्रष्टाचाराची मुळं शिंदेंपर्यंत गेल्याचा आरोप

मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्प शिंदेंनी व्यावसायिकांच्या हितसंबंधांसाठी केल्याचा आरोप

शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आल्याचं दिसून आलं नाही.... मात्र आता आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

Chest Pain : छातीचं दुखणं की हार्ट अटॅकचे लक्षण? कसा ओळखाल 'या' दोघांमधील फरक?

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

SCROLL FOR NEXT