Jitendra Awhad Gopichand Padalkar  Saam Tv
महाराष्ट्र

Jitrendra Awhad : विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल तर... विधान भवनातील हाणामारीवर जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट

Jitendra Awhad Gopichand Padalkar : आज विधान भवनामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राड्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

Jitrendra Awhad Statement : विधान भवनाच्या लॉबीत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. याबाबत गोपीचंद पडळकर यांनी उत्तर देणे टाळले आहे. आम्ही गेटवर होतो, काय घडलं माहीत नाही असे पडळकर यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकरांनी या हाणामारीवर बोलणे टाळले असले तरी यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हाणामारीबाबत प्रश्न विचारला असता, हल्ला कोणी केला? असा प्रतिप्रश्न आव्हाडांनी केला. हा हल्ला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी केला, असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

'अख्ख्या महाराष्ट्राला समजलं की कोणी हल्ला केला...आम्हाला याच्यापेक्षा काही जास्त पुरावेच द्यायचे नाहीत. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करत असतील तर आम्हीच सुरक्षित नाहीत. मी स्वतः याबाबत ट्विट टाकलं आहे. शिवीगाळ करतो, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर...असं बोललं जातंय, काय चाललंय काय विधानसभेत' असे आव्हाड म्हणाले.

'मी भाषण करून बाहेर आलो...मोकळ्या हवेवर आलो होतो. हे मलाच मारण्यासाठी सगळे आले होते. विधानसभेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आणि विधानभवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आम्हाला शिव्या देतो. त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून घोषित करा ना. असंसदीय शब्द वापरले जातात. सत्तेची एवढी मुजोरी. एवढा माज आहे का सत्तेचा?' असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालन्यातील कुंभार पिंपळगावमध्ये रस्ता रोको

पेपरफुटीविरोधात उद्रेक! MPSC सचिवांच्या तोंडाला काळं फासलं, पुण्यात गदारोळ

Online Shopping: ‘50% OFF’ पाहून वस्तू घेण्याआधी थांबा! आता बदलणार डिस्काउंटचा नियम

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT