Nitesh Rane, Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: राजकारण तापलं! भर अधिवेशनात नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले; '१० मिनिटे त्यांचे संरक्षण काढा पुन्हा...'

नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली.... (Nitesh Rane On Sanjay Raut)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Assembly Budget Session 2023: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला होता. राऊतांंनी कोल्हापूरमध्ये केलेल्या या वक्तव्याचे मुंबईत विधीमंडळ अधिवेशनात जोरदार पडसाद उमटले. राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली.

या सगळ्या गोंधळानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत संजय राऊतांचं १० मिनिटं संरक्षण काढा, ते परत दिसणार नाही”, असे वक्तव्य केले.

भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी “आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे," अशा शब्दात हल्लाबोल केला.

तसेच याबद्दल पुढे बोलताना राऊतांना दिलेलं संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेलं संरक्षण आहे, फक्त १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा तसेच शिंदे गटातील नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्यावर देवेंद्र फडणवीसांसह शिंदे गटातील आमदारांनी जोरदार हल्ला चढवला. त्यामुळेच आज दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले... (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एसटी बसचा कंडक्टर तर्राट, केबिनजवळ डुलत गेल्यानंतर ड्रायव्हरनं काय केलं बघा! VIDEO

Devabhau Chashma: बदलापूरचा 'देवाभाऊ चष्मा' ५५ देशात, किंमत फक्त ३३ रुपये; काय आहेत वैशिष्ट्ये?

Wallet Vastu Tips: पाकिटात ठेवू नका या वस्तू, आर्थिक तंगी भासेल

Pyaar Mein Hain Hum : टी-सीरिजकडून खास गिफ्ट! रोमँटिक पावसाळी गाणं "प्यार में है हम" ने चाहत्यांची मने जिंकली

SCROLL FOR NEXT