Neelam Gorhe Saam tv
महाराष्ट्र

Budget Session 2023: 'सभागृहात लक्षवेधी लागू नये म्हणून संबंधित व्यक्ती...' निलम गोऱ्हेंची धक्कादायक माहिती

Neelam Gorhe: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरुन अधिवेशन सध्या चांगलेच गाजत असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Budget Session: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरुन अधिवेशन सध्या चांगलेच गाजत असल्याचे दिसत आहे. आजच्या कामकाजात उपसभापती निलम गोऱ्हे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लक्षवेधी लागू नये म्हणून संबंधित लोक विधानभवन परिसरात येत असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, सभागृहात लधवेधी लागल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्याला भेटायला येत असल्याचे निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी निदर्शनास आणून दिले. सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित विषयाशी निगडित व्यक्ती आमदांमार्फत अधिवेशन सुरु असताना विधान भवन परिसरात येतात. आणि आमदारांसोबत माझी भेट घेण्याचा प्रयत्न करतात. हे असं होणं योग्य नाही. इथपुढे अशाप्रकारे कुणीही आलेलं चालणार नाही, अशी सुचना निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

तसेच एकंदरितच लक्षवेधी लागू नये यासाठी गळ घातली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हे चालणार नाही याच उदाहरण म्हणजे नुकतच खासगी सावकार प्रकरणात एक आमदार ज्या सावकाराविरोधात लक्षवेधी लागली होती. त्यांना घेऊन माझ्या दालनात आले होते. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यासोबत संबंधित प्रकरणाचा अधिकारी देखील उपस्थित होता, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT