Sanjay Raut News: 'मुख्यमंत्री नव्हे, मख्खमंत्री...'; CM शिंदेंवर संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut On CM Eknath Shinde: मला तोंड उघडायला लावू नका, मी परत सांगत आहे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही.
Sanjay Raut
Sanjay Rautsaam tv
Published On

Maharashtra Politics : राज्यात गेल्या महिन्याभरापासून ठाकरे गट आणि शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे करत आहेत. न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्याररोप देखील सुरू आहेत. अशात खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. (Political News)

'या राज्याला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. मुख्यमंत्री फक्त 40% आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहेत, बाकी काही नाही. त्यांचं सरकार अस्तित्वात नाही म्हणून तर गदारोळ आणि अराजक्ता माजलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात लाल वादळ येऊन ठेपलं आहे. किती काळ तुम्ही त्यांना रोखून धरणार आहात?, अशी टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Sanjay Raut
Maharashtra Politics : चाळीस साठचा फॉर्मुला पण शिंदे गटाला भोपळा; अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

इथे जर अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रामध्ये वणवा पेटेल

'दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करत आहेत. ते सर्व महाराष्ट्र लुटायला निघालेत. महाराष्ट्रात अस्थिरता माजवत आहेत, हे आम्ही सहन करणार नाही. इथे जर अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रामध्ये वणवा पेटेल. महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होतील तसेच उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा होतील. २६ मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावला सभा आहे मी त्यासाठीच चाललो आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Special Report : आक्रमक शेतकऱ्यांसमोर सरकारचा नरमाईचा सूर? #farmer #politics

मला तोंड उघडायला लावू नका मी ...

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अशात यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'मी या प्रकरणावर बोलणार नाही तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीसारखे कुटुंबापर्यंत जात नाही, भारतीय जनता पार्टीला कुटुंबापर्यंत पोहोचण्याची सवय आहे. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. '

'गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंग प्रकरण गेलं असेल तर ते गंभीर आहे. यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र हे लोक काल काय महाविकास आघाडीमध्ये झालं याच्यावर रेकॉर्ड वाजवत आहेत. त्यांचा निशाणा नेहमी विरोधकांवरती असतो. परंतु आमच्याकडे इशारा करताना स्वतःकडे देखील बोट आहेत हे पहावे. मला तोंड उघडायला लावू नका, मी परत सांगत आहे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. आमच्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत आम्ही ते कायम पाळत असतो, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com