Maharashtra Politics : चाळीस साठचा फॉर्मुला पण शिंदे गटाला भोपळा; अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत

Political News : वर्धेत समित्याच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजी
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

चेतन व्यास

Wardha News : राज्यात शिंदे फडणवीसच सरकार आल्यावर महाविकास आघाडीच्या काळातील सर्व समित्या रद्द करण्यात आल्या होत्या. या सर्व समित्यावर नवीन नियुक्ती करण्यासंदर्भात चाळीस साठ असा फॉर्मुला ठरविण्यात आला होता.

मात्र आता नुकतेच वर्धेत पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार समितीची यादी जाहीर केलीय. आठही तालुक्यात जाहीर केलेल्या यादीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले नाहीय. यामुळे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सुर असून काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Nagpur Medical News : भयंकर! नागपूर मेडीकलमध्ये २४ तासांत ११ मृत्यु; संपकाळात रुग्णांच्या मृत्युचं प्रमाण वाढलं

जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेच्या नामनिर्देशीत केलेल्या सदस्यांची यादी प्रशासनाने जाहीर केलीय. या यादीत शिंदे (Eknath Shinde) फडणवीस सरकारने ठरविलेल्या फॉर्मुल्याला हरताळ फासण्यात आले आहे.

जाहीर झालेल्या समित्यामध्ये एकूण 90 अशासकीय सदस्यांची तर 18 शासकीय सदस्य आहे. यात वर्धा शहर, वर्धा ग्रामीण, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा आणि सेलू येथील संजय गांधी निराधार समिती आहे. सर्वच तालुक्यातील नियुक्त सदस्यांमध्ये शिंदे गटाच्या एकालाही स्थान देण्यात आले नाहीय. यामुळे आता शिंदे गटातील पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.

समित्यामध्ये सदस्य नियुक्ती करीता शिंदे गटाला चाळीस टक्के तर भाजपाला साठ टक्के स्थान देण्याचं पहिलेच ठरले होते. त्यानुसार शिंदे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी तालुकानिहाय समितीतील सदस्यांची यादी शिंदे गटाचे पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख किरण पांडव यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पालकमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहचवली.

मात्र या यादीतील एकही कार्यकर्त्याला समितीत स्थान देण्यात आले नाहीय.यादी जाहीर झाल्यावर शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली मात्र त्यांची सध्या समजूत काढण्यात आली आहे.

Maharashtra Politics
Buldhana News: जिल्ह्यातील ६५ नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या; सरकारी कर्मचारी संपाचा फटका

जिल्ह्यात समिती नियुक्ती बद्दल झालेल्या प्रकारची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचवीला असून मुख्यमंत्री यावर तोडगा काढणार असल्याची माहिती शिंदे गटाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी दिलीय.

तीन फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धेत शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात संघटना वाढविण्याचा संदेश दिला.मात्र मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना वर्धा जिल्ह्यात समितीत स्थान न दिल्याने भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात जिल्ह्यात कुरबुर पहावयास मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com