अमर गटारे, साम टीव्ही प्रतिनिधी, अमरावती
Daryapur Murtizapur road accident two labourers killed : अमरावतीमधील दर्यापूर मुर्तीजापूर रोडवर भरधाव कारने समोरील दुचाकीस जबर धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. घर बांधकाम मजूर गौतम अणा मोहोड, कैलास एकनाथ पेठकर अशी मृतांची नावे आहेत. दर्यापूर येथून काम आटोपून दोघेही गावी जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर-मुर्तीजापूर रोडवरील समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक गौतम मोहोड व सहकारी कैलास पेठकर यांना डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. अपघाताची नोंद केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम अणा मोहोड आणि कैलास एकनाथ पेठकर हे दुचाकीवरून दररोज कामासाठी दुसऱ्या गावात जात होते. बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या मोहोड आणि पेठकर यांच्यावर काळाने घाला घातला. रविवारी संध्याकाळी कामावरून घरी परत जात असताना काळाने घाला घातला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. पेठकर अन् मोहोड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून तपास करण्यात येत आहे. दरम्यान, कारची धडक इतकी भयानक होती की दुचाकीचा चुराडा झाला. कारचा समोरील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दर्यापूर पोलीसांनी पंचनामा करून अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. घटनेनंतर कारचालक फरार झाले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.