Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra News : निवडणुकीआधी ‘गुलाबी पंचा’मुळे पुन्हा चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा लूक आला समोर

Maharashtra News : अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुलाबी पंचा परिधान करून दिलेल्या निवेदनामुळे राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. पारंपरिक तिरंगी रंगाऐवजी गुलाबी रंगाचा वापर केल्याने ‘कलर पॉलिटिक्स’ची नवी लाट सुरू झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Alisha Khedekar

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबी पंचा परिधान करून दिलेलं निवेदन चर्चेत

पारंपरिक तिरंगी रंगाऐवजी गुलाबी रंगाचा वापर करून नवा राजकीय संदेश दिल्याची चर्चा.

विधानसभा निवडणुकीत गुलाबी जॅकेट परिधान करणाऱ्या अजित पवारांचा जुना ट्रेंड पुन्हा चर्चेत.

नगर शहरात “गुलाबी पंचा”मुळे ‘कलर पॉलिटिक्स’ची नवी सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिलेल्या निवेदनावेळी ‘गुलाबी पंचा’ परिधान केल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे. वाहतूक आणि विविध स्थानिक समस्यांबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक निळा-हिरवा-पांढरा या तिरंगी रंगांच्या ऐवजी गुलाबी पंचा घालून उपस्थिती लावली.

जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या अंगावर गुलाबी पंचा पाहून अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. पंच्यावर ‘राष्ट्रवादी’ अशी अक्षरे कोरलेली होती. पारंपरिक पक्षरंग बाजूला ठेवून गुलाबी रंग स्वीकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गुलाबी रंगाचा वापर करण्यामागे नेमकं कारण काय, याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका मांडलेली नाही. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट परिधान करून प्रचार केला होता. हे विशेष उल्लेखनीय ठरते. त्यानंतर आता पुन्हा गुलाबी रंगाचा वापर झाल्याने पक्षाच्या नव्या रणनीतीकडे किंवा प्रतिमाबदलाच्या प्रयत्नांकडे पाहिले जात आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या गुलाबी पंच्यामुळे अजित पवार गटाची नवीन ‘कलर पॉलिटिक्स’ सुरू झाली का, असा सवाल सध्या नगर शहरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र हा गुलाबी रंगच का? असा प्रश्न सर्वत्र सामान्य नागरिकांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark neck remedies: सतत घाम येऊन मान काळी पडलीये? या एका घरगुती उपायाने काळवंडलेली मान होईल स्वच्छ

तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट; २ आमदार असलेल्या पक्षाचा विजय यांच्यावर हल्लाबोल

Genelia Deshmukh Mangalsutra Bracelet: अभिनेत्री जेनेलियाने कुणाच्या नावाचं मंगळसूत्र ब्रेसलेट घातलं? फोटो पाहा

Nashik TCS: इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल|VIDEO

Maharashtra News Live Update: नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानला कोर्टात हजर केलं

SCROLL FOR NEXT