Agriculture Scam Saam Tv
महाराष्ट्र

Agriculture Scam: कृषी साहित्यात कोट्यवधींचा घोटाळा, शेतकऱ्यांच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; 21 कोटी लाटणाऱ्या 15 अधिकाऱ्यांचं निलंबन

Dharashiv Agriculture Scam: कृषी खात्यात मोठा घोटाळा समोर आला आहे. तब्बल २१ कोटींचा हा घोटाळा आहे. १५ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Priya More
  • धाराशिवमध्ये कृषी विभागाचा कोट्यवधीचा घोटाळा

  • शेतकऱ्यांच्या निधीवर कृषी अधिकाऱ्यांचा डल्ला

  • १५ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

  • कृषी साहित्य वाटपात २१ कोटींचा घोटाळा

  • बनावट लाभार्थ्यांच्या नावावर कृषी साहित्य वाटप

साम टीव्ही न्यूज

कृषी खात्यात कोट्यवधींचा घोटाळा समोर आलाय. शेतकऱ्यांच्या साहित्यसाठी आलेल्या निधीवर कृषी अधिकाऱ्यांनीच डल्ला मारल्याचा पर्दाफाश झालाय. किती कोटींचा आणि कसा केला हा घोटाळा? कोणते अधिकारी यात सहभागी आहेत? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

सरकारी अधिकारी म्हणजे जाऊ तिथे खाऊ. याचा प्रत्यय पुन्हा एकदा कृषी खात्यात आलाय. कृषी खात्यात शेतकऱ्यांच्या साहित्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची लूट केलीय. एकट्या धाराशीव जिल्ह्यात 17 कृषी अधिकाऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील शेतकऱ्यांच्या 21 कोटींच्या निधीवर डल्ला मारला. या अधिकाऱ्यांनी नेमका कसा भ्रष्टाचार केला ते पाहूयात...

22 कोटींच्या कृषी निविष्ठा वाटपासाठी शेतकऱ्यांची बनावट लाभार्थी यादी तयार करण्यात आली. यादीत मृत, भूमिहीन, बिनशेती व्यक्ती तसेच अपात्र व्यक्तींची नावे टाकण्यात आली. बनावट लाभार्थ्यांच्या नावावर बियाणे, औषधे आणि इतर कृषी साहित्याचे वाटप केल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही लाभ न देता, केवळ बनावट बिले आणि कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात तब्बल 21 कोटी 32 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.

या घोटाळ्य़ाच्या चौकशीत तब्बल 17 अधिकारी दोषी आढळलेत. त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे केलीय. मुळात कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यात आलीय. मात्र या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन पैसे वसुल करायला हवेत, अशी मागणी आमदार कैलास पाटलांनी शासनाकडे केलीय.

अधिकाऱ्यांनीच भ्रष्टाचार करत कृषी साहित्याचे पैसे लाटल्यानं या प्रकरणामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता यांना थेट बडर्तफ करायला हवं. त्याशिवाय भ्रष्ट व्यवस्था मुळापासून संपणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

जळगाव हादरले! शाळा परिसरातच दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने सपासप वार; जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

SCROLL FOR NEXT