Manikrao Kokate Saam Tv Youtube
महाराष्ट्र

Manikrao Kokate : कृषीमंत्री म्हणतात, ढेकळाचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा बरळले

Manikrao Kokate News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य केलंय... त्यामुळे नवा वाद पेटलाय.. मात्र माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य काय आहे? आणि त्यावरुन कसा वाद निर्माण झालाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Bharat Mohalkar

भीक नको, पण कुत्रं आवर, ही मराठीतली म्हण.... मात्र अशीच गत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झालीय... कारण पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेलं असंवेदनशील वक्तव्य....आधी अवकाळी आणि त्यानंतर मान्सूनने पीकं उद्ध्वस्त झालेत... त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर मारणं तर सोडाच पण मंत्री महोदयांनी थेट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय....

हार्वेस्टिंग झालेला मालही अवकाळी पावसानं पाण्याखाली गेलाय...सरकारी आकडेवारीनुसार राज्यात 35 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकं बाधीत झालेत.. त्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे सोडून असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय....तर विरोधकांनीही कृषिमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर तिखट प्रतिक्रीया दिलीय....तर वादानंतर माणिकराव कोकाटेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय...

कृषिमंत्र्यांकडे लाखो शेतकऱ्यांचं पालकत्व असतं... त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्रिमंडळात भांडायचं असतं.. मात्र कृषिमंत्रीच शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेची खिल्ली उडवताना दिसताहेत....आतापर्यंत कोकाटेंनी काय वादग्रस्त वक्तव्य केली आहेत? पाहूयात...

याच वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना समज दिली होती. मात्र त्यानंतरही कृषीमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे अशा असंवेदनशील वक्तव्यांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षाच्या कोकाटेंवर काय कारवाई करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT