Agriculture Minister Manikrao Kokate seen allegedly playing rummy during a legislative session, sparking political outrage.  Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: शेतकरी मरतोय आणि मंत्री खेळतोय रमी; कोकाटेंच्या 'रमी' डावावरून खळबळ

Rummy in the House: शेतकऱ्यांच्या मालाला नाही हमी आणि कृषीमंत्री खेळतायत रमी.. अशीच परिस्थिती विधानपरिषदेत पाहायला मिळालीय. कृषीमंत्र्यांच्या अडचणी रमीचा डावानं कशा वाढवल्या? कोकाटेंनी रमीबद्दल काय स्पष्टीकरण दिलयं?

Suprim Maskar

विधानपरिषदेत रमीचा हा डाव खेळणारे हे आहेत.. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे... ढेकळांचे पंचनामे करण्याची गरज नाही, असं वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्याच्या दुखांवर मीठ चोळणारे हेच कृषीमंत्री सभागृहात चक्क रमीच्या डावात व्यस्त आहेत... यावरुनच गरीब शेतकऱ्याच्या बांधावर आओ ना महाराज असं म्हणत रोहित पवारांनी कोकाटेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

शेतकरी कर्जाचे पैशांतून लग्नसमारंभा करतो, असं म्हणणाऱ्या कृषीमंत्र्यांनी सभागृहातील रमी खेळतानाच्या व्हिडिओवर अजब स्पष्टीकरण दिलयं. तो मी नव्हेच, असाच काहीसा त्यांच्या विधानाचा सूर होता...दुसरीकडे आमिर खान , सलमान खान रमी खेळतात असं म्हणत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कोकाटेंच्या कृत्याचं समर्थन केलंय...

तर भाजप नेते अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीसांना केली असून यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे...राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढत असताना सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव रंगलाय.... जानेवारी 2025 ते मार्च 2025 पर्यंत शेतकरी आत्महत्याची आकेडवारी

शेतकऱ्याच्या आत्महत्या, कृषीमंत्र्यांचा रमीचा डाव

विदर्भात गेल्या तीन महिन्यात 257 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

2024 मध्ये राज्यात 2635 शेतकरी आत्महत्या

एका बाजूला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्यांच्या हाका कृषीमंत्र्यांच्या कानापर्यंत पोहचत नाहीत, त्यामुळे शेतकरी मरतोय आणि मंत्री रमी खेळतोय अशी सध्याची परिस्थिती आहे... विधानभवनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावायचे सोडून शेतकऱ्याच्या मरणावर केलेली ही थट्टा कधी थांबवणार, हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'ची वीकेंडला छप्परफाड कमाई, 3 दिवसांत केलं बजेट वसूल

Chaddi Gang Video : सोलापुरात चड्डी गँगची दहशत, साखर झोपेत असताना साधतेय डाव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Maharashtra Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, अनेक बड्या नेत्यांनी सोडली अजित पवारांची साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचे १५०० रुपये बंद होणार, सरकारने पुन्हा सुरु केली पडताळणी

SCROLL FOR NEXT