Maharashtra CM  saamtv
महाराष्ट्र

Nagpur Smart City: राज्यातील ३५०० गावे स्मार्ट अन् इंटेलिजेंट होणार, नागपूरमध्ये पहिला प्रयोग, गावकऱ्यांना काय फायदा होणार?

Nagpur Satavnari Smart City: नागपूरमधील सातवनरी गाव हे गाव आदर्श मॉडेल ठरले आहे.आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून भारतातील पहिलं गाव सातवनरी ठरलं आहे.

Siddhi Hande

नागपूरमधील सातनवरी गाव स्मार्ट व इंटेलिजेंस ठरले

गावकऱ्यांना मिळणार आधुनिक सुविधा

३५०० स्मार्ट गावे करण्याचे उद्दिष्ट

देशाचा विकास व्हावा या उद्देशातून सरकारने अनेक उपक्रम राबवले आहे. यातील एक उपक्रम म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत क्रांती घडवणारे एक सातनवरी हे आदर्श गाव ठरले आहे. या गावाने शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती केली आहे. राज्यातील पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजेंस गाव नागपूरमधील सातनवरी ठरले आहे. या गावाने खूप प्रगती केली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातून १० स्मार्ट व इंटेलिजेंस गावे तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३,५०० गावांचा कायापालट होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रिय दूरसंचार मंत्रालयाने व्हॉइसने २४ कंपन्यांच्या मदतीने सातनवरी गावात प्रायोगिक तत्त्वार आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा सुरु केली आहे. या गावातील देशातील पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंस गाव म्हणून घोषित करण्यात आले.

स्मार्ट आणि इंटेलिजेंस गाव कसं? (What is Smart And Intelligence Village)

देशात भारतनेट प्रकल्पाच्या धर्तीवर महानेट प्रकल्प राबवला आहे.

याअंतर्गत भारतीय तंत्रज्ञानाद्वारे कंपन्यांद्वारे स्मार्ट आणि इंटेलिजेंस गावाची योजना आणण्यात आली. यासाठी सातनवरी या गावची निवड करण्यात आली आहे.

सातनवर हे गाव नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर स्थिर आहे. येथे अनेक सुविधा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे.

शिक्षणासोबत स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके, खतफवारणी, बँक ऑन व्हील अशा १८ सेवा सुरु करण्यात आल्या आहेत.

गावकऱ्यांना फायदा काय? (Smart And Intelligence Village Benefits to Vilagers)

शेती

गावकऱ्यांना शेतीत खूप फायदा होणार आहे. आधुनिक साधनांनी माती तपासल्याने शेती वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे.यामध्ये ड्रोनने पिकांवर लक्ष, मोबाईल अॅपवर हवामानाचा अंदाज याबाबत माहिती मिळणार आहे.

शिक्षण

डिजिटल पुस्तके, AI-सक्षम स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट अंगणवाडीमुळे शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

आरोग्य

ई-वेल्थ कार्डद्वारे आरोग्याबद्दल डिजिटल नोंद होईल.

शासकीय कामकाज

ग्रामपंचायतीतून ऑनलाइन अर्ज, डिजिटल कार्ड या सरकारी योजनांबाबत तुम्हाला डिजिटल माहिती मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT