Mumbai Pune municipal corporation elections schedule Saam Tv
महाराष्ट्र

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

Mumbai Pune municipal elections announcement date : मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. पुढील दोन दिवसांत आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra 29 municipal corporation elections Date update : मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर अन् चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात आयोगाकडून याबाबतची घोषणा होईल. १५ तारखेनंतर राज्यात कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. २९ महापालिकेसाठी १२ जानेवारीनंतर मतदान होईल अन् दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो. (Maharashtra local body election schedule)

नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकेतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होईल अन् मगच निवडणुका घेतल्या जातील, असा तर्क लावला जात होता. पण आयोगातील सूत्रांनी २९ महापालिकाच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील, असे सांगितले. दरम्यान, ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणुका घेऊ नये, असे कोर्टाच्या आदेशात कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका होतील अन् निकालही लागेल. पण निकाल ओबीसी आरक्षण आणि ५० टक्क्यांची ओलांडलेली मर्यादा याबाबत न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे.

निवडणूक आयोगाकडून राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी महापालिकांना निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकाऱ्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. राज्यात १५ डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप, काँग्रेस अन् ठाकरेंकडून महापालिकेतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत. भाजपने महत्त्वाच्या महापालिकेत सर्वेक्षणही केलेय.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होणार?

राज्यात अखेरच्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील २० जिल्हा परिषदेतील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे एका खात्रीलायक सूत्राने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

'सोसायटी स्थापन न केल्यास थेट गुन्हा'; बिल्डरांना राज्य सरकारचा दणका

Maharashtra Live News Update: दर्यापूरच्या रामतीर्थ फाट्यावर चार चाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT