Maharashtra : पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता! SaamTV
महाराष्ट्र

Maharashtra : पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता!

राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड लवकरच मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली असून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबत गायकवाड लवकरच मंत्रीमंडळ आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करणार आहेत.

हे देखील पहा :

आज वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सुरू असलेल्या शाळांबाबतचा आढावा घेतला. राज्यात शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत. या तीन आठवड्याचा अनुभव लक्षात घेता राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करावेत अशी भूमिका राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मांडली.

सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. आता सरसकट पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर मांडून टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT