Sunetra Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: वहिनी राज्यसभेत, भुजबळ नाराज? सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलीये. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली.

Bharat Jadhav

तन्मय टिल्लू , साम प्रतिनिधी

सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झालीय. सुनेत्रा पवारांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिलीये.त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागलीय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्यात. मात्र राज्यसभेसाठी इच्छुक असलेले भुजबळ मात्र नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात. काय कारणं आहेत बघूया.

बारामीत लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून सुनेत्रा पवारांचा झालेला पराभव बहुदा अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळेच जणू त्यांनी सुनेत्रा पवारांना खासदार बनवण्याचा चंगच बांधला आणि तो पूर्णही केला. लोकसभेच्या पराभूत उमेदवार सुनेत्रा पवारांचं नाव राज्यसभ्येसाठी निश्चित झालं त्यांनी अर्जही भरला आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. मात्र, आपणही राज्यसभेसाठी इच्छुक होतो असं सांगत भुजबळांनी नाराज असल्याचेच संकेत दिले आहेत.

सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड झाल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वारंवार करण्यात येतोय. सुनेत्रा पवार स्वत: मात्र पार्थ पवारांनी त्यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतल्याचं सांगितलं. लोकसभा निवडणुकीतही नाशिकच्या जागेवरुन भुजबळांना माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे भुजबळ नाराज होतेच. त्यामुळे त्यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशा शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र वहिनींमुऴे भुजबळांतं दिल्ली जाण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं. भुजबळ राज्यसभेवर गेले असते तर त्यांना समीर किंवा पंकज भुजबळांसाठी नाशिकच्या राजकारणातला मार्ग मोकळा करता आला असता. मात्र आता त्यांचं समीकरण बिघडल्याचं दिसंतय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हट्टानं पराभूत सुनेत्रा पवारांचं राजकीय पुनर्वसन करायचं ठरवलंय. मात्र भुजबळांसारख्या बड्या ओबीसी चेहऱ्याची नाराजी कितीदा अजित पवार ओढवून घेणार हाच खरा प्रश्न आहे. यातून अजित पवारांच्याच राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी सुप्त संघर्ष आणखी वाढणार का? याचे परिणाम विधानसभा निवडणुकीतच पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT