Reactions on Sharad Pawar-Ajit Pawar Meet Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'अजित पवार गटाच्या फ्लेक्सवरुन शरद पवार गायब...' फोटो न वापरण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना

Maharashtra NCP Crisis: अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फ्लेक्सवर फोटो न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Maharashtra Politics: अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी त्यांचे फोटो न वापरण्याची सक्ती केली होती. त्यानंतरही अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवार झळकले होते. मात्र आता अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचे फोटो न वापरण्याच्या सुचना दिल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांना फ्लेक्सवर शरद पवार (Sharad Pawar) यांचे फोटो न वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून खबरदारीचा उपाय म्हणून फ्लेक्सवर फोटो न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सुचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी योगेश क्षिरसागर यांच्या पक्षप्रवेशावेळी फ्लेक्सवर शरद पवार यांचा फोटो नसल्याने माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर याबाबतचा खुलासा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

बीडच्या सभेच्या टीझरमधूनही वगळले...

अजित पवार गटाची लवकरच बीडमध्ये (Beed) जाहीर सभा होणार आहे. या सभेचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्येही शरद पवार यांचा फोटो वगळण्यात आला आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून २७ तारखेची सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा दावा मुंडेंनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT