Maharashatra Assembly Speaker Rahul Narwekar Wrote Letter To Chief Minister Eknath Shinde For Changing Alibaug Name Yandex
महाराष्ट्र

Alibaug Rename Issue: अलिबागच्या नामांतराची चर्चा; नवीन नाव सूचवलं

Alibaug Name Change: अलिबाग बदलण्याची मागणीसाठी अखिल भारतीय भंडारी महासंघाच्या शिष्टमंडळाने राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित नामांतर करण्याची मागणी केलीय.

Bharat Jadhav

Rahul Narwekar Wrote Letter To Cm Shinde On Alibag Name Change :

औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादनंतर आता अलिबागचेही नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देत नाव बदलाची मागणी केलीय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना खूप महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टी ठेवत बलाढ्य आरमाराची उभारणी केली. समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवला तर सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी मायानाक भंडारी यांच्याकडे महाराजांनी सोपवली होती. मायानाक भंडारी हे कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे शूर लढवय्या होते. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचे पर्व अतिशय ऐतिहासिक आणि पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. याचा संदर्भ घेत अलिबाग शहरासह तालुक्याचे नाव “मायनाक नगरी” असे ठेवावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरांनी केलीय. या मागणीसंदर्भात ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

अलिबाग (Alibaug) बदलण्याची मागणीसाठी अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सह सचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राहुल नार्वेकर यांची भेट घेतली होती. ही मागणी अतिशय रास्त असून त्याची शासन स्तरावरून उचित दखल घ्यावी.

नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केलीय. अलिबागचे नाव 'मायनाक नगरी' करण्याची मागणी नार्वेकरांनी केली. परंतु विधान सभा अध्यक्षांच्या या मागणीला अलिबागमधून विरोध होऊ लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kurdai Bhaji: थोडं तिखट, झणझणीत आणि घरगुती चवीचं काहीतरी खायचंय? मग ही मराठवाडा स्टाईल कुरडई भाजी होऊन जाऊदेत

Maharashtra Live News Update: कन्या सेरेना मस्कर हिने युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत मिळवले गोल्ड मेडल

ISRO LVM3 Launch : भारताची ताकद वाढली, इस्रोची 'बाहुबली' झेप! LVM3 रॉकेटने रचला इतिहास |VIDEO

Ladki Bahin Yojana: वडील आणि पती दोघेही हयात नाहीत, लाडक्या बहिणींनी eKYC कशी करायची? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भयंकर! पोटच्या २ मुलांकडून आई वडिलांची हत्या; घरातच दोघांना संपवलं, कारण फक्त..

SCROLL FOR NEXT