Maharahstra Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Maharahstra Politics: विधानसभेसाठी भाजपचा मेगाप्लॅन? भाजप 155 ते 160 जागा लढणार?

Maharahstra Assembly Election: लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी भाजपनं केली आहे. भाजप किती जागा लढणार ? पक्षाची रणनिती काय असणार आहे? पाहूया या रिपोर्टमधून

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर भाजपनं आता कंबर कसलीय. ((खरतंर लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा बनला होता. जागावाटपाच्या मतभेदांमुळे अनेक जागांवर शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर झाले होते. आता विधानसभेलाही काही वेगळी स्थिती नाही.

महायुतीतील तिन्ही पक्ष किती जागांवर लढणार याचे आकडे जाहीरपणे देत आहेत.)) त्यासाठी भाजपनं मेगाप्लॅन आखल्याचं समजतंय. या रणनितीचा पहिला भाग आहे तो म्हणजे जागावाटपाचा..भाजप 155 ते 160 जागा लढण्यावर ठाम असल्याचं सूत्रांकडून समजतयं. . याचाच अर्थ उरलेल्या 128 ते 133 जागा शिंदे सेना, अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील. तर दुसरीकडे पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचं सरकार येणार असं छातीठोकपणे सांगितलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 100 जागा मागितल्या असल्या तरी त्यांना 80 ते 90 जागा दिल्या जातील. उर्वरित जागा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि सहयोगी पक्षांना दिल्या जातील, अशी सुत्रांची माहिती आहे. अजित पवार गटाने मात्र आपल्याला 70 पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. कमी जागा मिळाल्या तर स्वतंत्र लढण्याचा विचार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याची चर्चा आहे.

लोकसभेतल्या अपयशानंतर भाजपचे नेते आक्रमक झालेत. फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय . तिन्ही पक्षांनी विद्यमान आमदारांच्या तिकिटात बदल केला तरी त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, असं ठरलंय.

विधानसभेत भाजपचे 105 आमदार आहेत. अन्य सदस्यांनी दिलेल्या पाठिंबामुळे भाजपची संख्या 115 पर्यंत गेली. शिवसेनेचे 55 उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी 40 आमदार शिंदे गटात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारां पैकी 39 आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. लोकसभेतल्या यशामुळे मविआचा आत्मविश्वास वाढलाय. विरोधकांची एकी पाहता महायुतीत जागावाटपात सुवर्णमध्ये काढण्याचं मोठ दिव्य भाजपला करावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT