मुंबई, पुणे आणि नवी मुंबईसह आज राज्यातील २९ महानगर पालिकांसाठीची मतमोणी सुरु आहे. दरम्यान निकालांचे आकडे हाती येण्यापूर्वी पनवेलमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्याचं दिसून येतंय. पनवेल महानगरपालिकेचे सात उमेदवार हे बिनविरोध झाले होते. अशातच आता निवडणूक आयोगाने त्यांना लगेच बिनविरोध झाल्याची घोषणा करण्याचा आदेश दिला आहे.
पनवेलच्या महापालिकेमध्ये भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध झाले होते. तर यामध्ये एक अपक्ष उमेदवार महिला बिनविरोध झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सात उमेदवारांना बिनविरोध म्हणून घोषणा करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या प्रशासनाला पनवेल महानगरपालिकेला दिले आहेत.
बिनविरोध निवडून येताना इतर उमेदवारांवर दबाव आणणं, आमिष दाखवणं, अन्य लेखी तक्रार, निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरण यापैकी कोणतीही बाब निदर्शनास आली नसल्याचा अहवाल सादर केला गेला. त्यामुळे खाली दिलेल्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
ममता प्रितम म्हात्रे (भारतीय जनता पक्ष) - जागा क्र. १८-अ
नितीन जयराम पाटील (भारतीय जनता पक्ष) जागा क्र. १८-ब
ढमाले स्नेहल स्वप्नील (अपक्ष) जागा क्र. १८-क
भोईर दर्शना भगवान (भारतीय जनता पक्ष) - जागा क्र. १९-अ
लोंढे रुचित गुरुनाथ (भारतीय जनता पक्ष) – जागा क्र. १९-ब
बहिरा अजय तुकाराम (भारतीय जनता पक्ष)- जागा क्र. २०-अ
कांडपीळे प्रियंका तेजस (भारतीय जनता पक्ष) - जागा क्र. २०-ब
पनवेल महापालिकेवर 2017 मध्ये भाजपने एक हाती सत्ता आणली होती. त्यावेळी महापालिकेमध्ये 78 नगरसेविकांपैकी 51 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. यंदाच्या वेळी पनवेल महापालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती केली आहे. गेल्या निवडणूकीमध्ये शिवसेनेला या ठिकाणी एकही जागा मिळाली नव्हती परंतु यावेळी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आहेत.
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं होतं की, आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. ग्रामीण, पनवेल महापालिकेत शहरी, ग्रामीण सिडको भाग समाविष्ट असून, पाणी, गटारं सार्वजनिक वाहतूक या समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना भेडसावत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.