राजेश भोस्तेकर
रायगड : महाडमध्ये आलेल्या पुराने शहरात अस्वच्छता पसरली असून आधी नागरिकांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. महाडमध्ये आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केले असून नागरिकांनी आधी आपल्या आरोग्याची तपासणी तातडीने करून घ्यावी असे कळकळीचे आवाहन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाडकरांना केले आहे. महाड मध्ये लवकरच एनडीआरएफ कॅम्प होणार असून त्याबाबत ऑर्डर काढण्यात आली आहे. पण त्याआधी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे.
हे देखील पहा -
महाडमधील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी पूरग्रस्तांना अन्न धान्याचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार भरत गोगावले उपस्थित होते. महाड मधील पूर ओसरला असून सगळीकडे माती आणि चिखल साचला आहे.
प्रशासनाच्या मार्फत स्वच्छता मोहीम हातात घेतली आहे. यासाठी महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणाही महाडमध्ये आली आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. महाड शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सर्वप्रथम आरोग्य तपासणी या कॅम्पमध्ये जाऊन करावी असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.